Sarvapitru Amavasya 2023 : सर्वपितृ अमावस्या आज, अशा प्रकारे करा तर्पण

जे लोकं पितृ पक्षातील 15 दिवस तर्पण, श्राद्ध वगैरे करू शकत नाहीत किंवा ज्यांना आपल्या पितरांची मृत्युतिथी आठवत नाही, त्या सर्व पितरांसाठी या अमावस्येला श्राद्ध, तर्पण, दान इ. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करणे उत्तम मानले जाते.

Sarvapitru Amavasya 2023 : सर्वपितृ अमावस्या आज, अशा प्रकारे करा तर्पण
पितृपक्षImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 9:05 AM

मुंबई : भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होणारा श्राद्ध पक्ष 14 ऑक्टोबरला म्हणजेच आज भाद्रपद महिन्यातील अमावस्येच्या दिवशी समाप्त होईल. हिंदू धर्मानुसार, पितृ पक्षामध्ये या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रमुख विधी केले जातात. सर्वपितृ अमावस्येचा (Sarvapitru Amavasya 2023) दिवस अशा पितरांचे श्राद्ध करण्यासाठी विशेषतः उपयुक्त मानला जातो ज्यांची मृत्यू तिथी कुटुंबातील सदस्यांना आठवत नाही. या दिवशी त्या पितरांसाठी काही विशेष विधी केले जातात आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.

सर्व पितृ अमावस्या तिथी

उदयतिथीनुसार सर्व पितृ अमावस्या 14 ऑक्टोबरला म्हणजेच आज साजरी केली जाईल. अमावस्या तिथी 13 ऑक्टोबर रोजी म्हणजेच काल रात्री 9.50 वाजता सुरू झाली आहे आणि अमावस्या तिथी 14 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज रात्री 11.24 वाजता समाप्त होईल.

कुतुप मुहूर्त – 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:44 ते 12:30 पर्यंत रोहीन मुहूर्त – 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:30 ते 1:16 पर्यंत दुपारची वेळ – 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:16 ते 03:35 पर्यंत

हे सुद्धा वाचा

अमावस्येला पितरांना असा द्या निरोप

जे लोकं पितृ पक्षातील 15 दिवस तर्पण, श्राद्ध वगैरे करू शकत नाहीत किंवा ज्यांना आपल्या पितरांची मृत्युतिथी आठवत नाही, त्या सर्व पितरांसाठी या अमावस्येला श्राद्ध, तर्पण, दान इ. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती मिळावी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठण करणे उत्तम मानले जाते.

अमावस्या श्राद्धात जेवणात तांजळाची खीर आणि उडदाच्या डाळीचे बोंडं असणे आवश्यक आहे. भोजन देण्याची व श्राद्ध करण्याची वेळ दुपारची असावी. ब्राह्मणाला भोजन देण्यापूर्वी पिंडदान करावे. ब्राह्मणाला श्रद्धेने अन्नदान करा, त्यांना दक्षिणा द्या. नंतर घरातील सर्व सदस्यांनी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करावी.

सर्व पितृ अमावस्या पूजन विधि

1. तर्पण- पितरांना दूध, तीळ, कुशा, फुले, सुगंधित पाणी अर्पण करा. 2. पिंडदान- भाताच्या पिंडांना अंगठ्याने पाणी देऊन तीन पिठीचे पिंडदान करावे. 3. गरिबांना कपडे दान करा.

या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा

शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडावर सर्व देवी-देवता आणि पितरांचा वास असतो. यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पूर्वज प्रसन्न होतात, असे मानले जाते. या तिथीला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी, काळे तीळ आणि दूध मिसळून पिंपळाच्या झाडाला अर्पण केले जाते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.