Sarvapitru Amavasya : सर्व पितृ अमावस्येला करा हा खास उपाय, प्राप्त होईल शनिदेवाचा आशिर्वाद
Sarva Pitru Amavasya 2023 ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्युतिथी आठवत नाही, ते सर्वपितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी ब्राम्हणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे. ब्राम्हणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे.
मुंबई : हिंदू धर्मात पितृ पक्षातील अमावस्येला विशेष महत्त्व आहे. जर एखाद्याला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नसेल तर तो त्यांना सर्व पितृ अमावस्येच्या (Sarva Pitru Amavashya 2023) दिवशी तर्पण देऊ शकतो. तसेच त्यांच्या नावाने गाईला पान लावू शकतो. 14 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी श्राद्ध पक्षाची सांगता होईल. असे मानले जाते की या दिवशी पितरांना तर्पण अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात.ज्यांना आपल्या पितरांची तिथी माहित नाही किंवा श्राद्ध पक्षात पूजा करता आली नाही तर ते या दिवशी पिंडदान करू शकतात. पितृदोष टाळण्यासाठी ही या दिवशी विशेष उपाय केले जातात.
कावळ्यांना खायला द्या
या दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते. याशिवाय असे केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात. हा उपाय प्रत्येक अमावास्येला केल्यास सर्व ग्रह स्वतःसाठी अनुकूल होऊ लागतात.
काळ्या गायीला पोळी खायला द्या
धार्मिक मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्येला काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते. अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गायीला भाकरी खाऊ शकता.
पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा
सर्वपित्री अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय शनिदेवही यामुळे प्रसन्न होतात.
गरिबांना अन्नदान करा
गरजूंना मदत केल्याने भगवान शनि खूप प्रसन्न होतात. त्यामुळे सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे.
सर्व पितृ अमावस्येला पितरांना असा द्या निरोप
ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्युतिथी आठवत नाही, ते सर्वपितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी ब्राम्हणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे. ब्राम्हणांना भोजनदान दिल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. आंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक तयार करा. स्वयंपाक सात्विक असावा आणि त्यात खीर असावी. पितरांच्या फोटोला हार घालावा. त्यांची पूजा करावी व घरी बनविलेल्या अन्नाचा नैवैद्य दाखवावा. त्यानंतर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)