Sarvapitru Amavasya : उद्या सर्वपितृ अमावस्या, पितरांना अशा प्रकारे द्या निरोप

या दिवशी विस्मृतीत गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते.  पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध पूर्ण मनाने आणि सर्व विधीपूर्वक केले तर पितरांच्या आत्म्यांना शांती तर मिळतेच पण त्यांच्या आशीर्वादाने कुटूंबात सुख-शांतीही नांदते. 

Sarvapitru Amavasya : उद्या सर्वपितृ अमावस्या, पितरांना अशा प्रकारे द्या निरोप
पितृपक्षImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 9:07 AM

मुंबई : शनिवार 14 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या सर्वपितृ (Sarvapitru Amavsya 2023) अमावस्या आहे. या दिवशी पितरांचे श्राद्धही केले जाईल. पितरांना खूश करण्यासाठी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातील. या दिवशी गाईला हिरवा चारा खाऊ घालणे तसेच कावळे, कुत्री, मुंग्या आणि अग्नीला अन्न देणे शुभ मानले जाते. यामुळे पुर्वजांचा आशिर्वाद लाभतो. अश्विन महिन्यातील कृष्ण अमावस्याला विसर्जनी अमावस्या असेही म्हणतात. पितरांचे श्राद्ध करून पितृ ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. जर एखाद्याला आपल्या पूर्वजांची पुण्यतिथी आठवत नसेल तर ते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करू शकतात.

असे आहे श्राद्धाचे महत्त्व

या दिवशी विस्मृतीत गेलेल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते.  पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध पूर्ण मनाने आणि सर्व विधीपूर्वक केले तर पितरांच्या आत्म्यांना शांती तर मिळतेच पण त्यांच्या आशीर्वादाने कुटूंबात सुख-शांतीही नांदते.  कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांना जीवनात येणाऱ्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

अशा प्रकारे द्या आपल्या पूर्वजांना निरोप

अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून शुभ्र वस्त्रे परिधान करावीत. यानंतर पितरांचे स्मरण करून सूर्याला अर्घ्य अर्पण करून त्यांचे श्राद्ध करावे. अमावस्येला तांदळाची खीर पुरी आणि भाजी करा. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करा की त्यांनी येऊन भोजन करावे. तसेच ब्राह्मणांना अन्नदान करा आणि त्यांना दान, दक्षिणा इत्यादी देऊन आशीर्वाद घ्या. घरातील सर्वांनी एकत्र जेवण केले पाहिजे. भोजन केल्यानंतर, पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. सर्वपित्र अमावस्येला कावळा, गाय, कुत्र्याला अन्न द्या. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा अवश्य करा.

सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण

वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील अश्विन महिन्यातील सर्वपित्री अमावस्येला होत आहे. सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण रात्री 08.34 ते दुसर्‍या दिवशी पहाटे 02.25 पर्यंत चालेल आणि हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल. जे भारतात दिसणार नाही आणि त्याचा सुतक काळही वैध असणार नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.