मुंबई : शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित असतो (Saturday Astrology Tips). शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटलं जातं. मान्याता आहे की शनिदेव सर्व कर्मांचा हिशेब ठेवतात आणि त्यानुसार ते फळ देतात. कुंडलीमध्ये शनि दोष, महादशा, साडेसाती असल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जर कुठल्या व्यक्तीवर शनिदेव मेहरबान झाले तर ते त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारची समस्या येऊ देत नाही. व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते (Saturday Astrology Tips To Please Shanidev For Prosperity).
ज्योतिष शास्त्रानुसार, जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्यावर शनिदेवाचा अशुभ परिणाम होत नाही. चला जाणून घेऊ कोणावर राहणार शनिदेवाची कृपा –
ज्योतिष शास्त्रानुसार जे लोक परिश्रम करतात त्यांच्यावर शनिदेवाची कृपा राहाते. या लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
धार्मिक मान्यतांनुसार, जे लोक स्वच्छता ठेवतात त्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात. ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आलं की जे लोक दातांनी नखं खातात त्यांच्यावर शनि देव नाराज होतात. त्यामुळे जर तुम्हाला ही सवय असेल तर आताच सोडून टाका.
शनिदेवाला न्यायाचा देवता म्हटलं जातं. जे लोक सत्य आणि न्यायाची साथ देतात, त्या लोकांवर शनिदेवाची कृपा नेहमी राहाते.
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारच्या दिवशी मोहरी तेल दान करा. त्याशिवाय शनि मंदिरात दिवा लावा यामुळे सर्व कष्टांतून मुक्तता मिळते.
शनिवारच्या दिवशी लोखंडाचं सामान चुकूनही खरेदी करु नका. मान्यतेनुसार, असं केल्याने शनिदेव नाराज होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी मीठ खरेदी करु नये. मान्यता आहे की मीठखरेदी केल्याने कर्ज वाढतं. कर्जापासून वाचण्यासाठी शनिवारी मीठ खरेदी करु नका.
जेव्हा कुंडलीत शनि ग्रहाचा प्रकोप होतो, तेव्हा आपल्या कार्यात कुठल्या ना कुठल्या कारणास्तव बाधा येत राहते, असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. तुमचे आरोग्य, धन, कुटुंब, व्यवसाय आणि नोकरीवरही याचा परिणाम होतो, असं बोललं जातं. त्यामुळेच शनीच्या अशुभ फळांपासून बचाव करण्यासाठी भाविक मार्ग शोधतात.
शनि दोष कमी करण्यासाठी शनिवारी काळ्या वस्तू दान कराव्यात, असं ज्योतिषशास्त्रात सुचवलं आहे. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काळ्या रंगाचे ब्लँकेट, छत्री दान करणे शुभ मानले जाते. याशिवाय काळ्या चपला गोरगरीब लोकांना दान करणे चांगले मानतात. शनिवारी मोहरीचे तेल आणि काळे उडीद दान करणे शुभ असते. याशिवाय मोहरीचे तेल अर्पण करुन दान दिल्याने शनिदेव प्रसन्न होतात, असेही मानले जाते.
Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…https://t.co/7usKGMbu8J#ShaniDev
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2021
Saturday Astrology Tips To Please Shanidev For Prosperity
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दानधर्म करा, साडेसातीची पीडा निवारण्याचे ज्योतिषशास्त्रात उपाय काय?
घरात शनिदेवाची मूर्ती ठेवणे वर्जित का? जाणून घ्या यामागील कारण…