Saturday Tips: शनिवारच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे उघडेल तुमच्या नशिबाचे दारं, मिळेल सुख समृद्धी
शनिवार हा शनिदेवाचा वार आहे. जर तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर शनिवारच्या दिवशी 'या' गोष्टी नक्की करा.
मुंबई, हिंदू धर्मात आठवड्यातला प्रत्त्येकचं दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे. त्यानुसारच शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे (Saturday Tips). शनिदेवाला न्यायदेवतादेखील म्हणतात. कारण शनिदेव हे मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्या या आपल्या कर्मानेच फळं असते. कर्माचे फळं तर टाळता येणे शक्य नाही, मात्र होणाऱ्या त्रासाला शनिदेवाच्या (Shanidev) कृपेने कमी करता येणे शक्य आहे. त्यामुळे शनिवारी केलेल्या काही उपायाने तुम्हाला त्रासातून आराम मिळू शकतो.
शनिवारी करा हे उपाय करा
- व्यवसायातील नुकसान किंवा कोर्टातील अडचणींचा सामना करीत असाल तर तर शनिवारी पीपळाची 11 पाने घेऊन त्याचा हार बनवावा. यानंतर शनि मंदिरात ही माला अर्पण करा. पुष्पहार अर्पण करताना ‘ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करत रहा.
- शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळावा आणि मनात शनिदेवाचे ध्यान करावे. असे केल्याने तुमच्या प्रगतीच्या मार्गात कोणतीही अडचण येणार नाही.
- वैवाहिक जीवनातून सुख नाहीसे होत असेल आणि त्यासाठी काही काळे तीळ घेऊन शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करावे. तीळ अर्पण केल्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणीही अर्पण करावे. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल.
- जी व्यक्ती नोकरीच्या शोधात आहे किंवा आपले उत्पन्न वाढवू इच्छित आहे परंतु यश मिळत नाही त्यांनी शनिवारी एक काळा कोळसा वाहत्या पाण्यात अर्पण करावा. यासोबत ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा.
- घरात सुख, शांती आणि समृद्धी मिळवायची असेल तर पुष्पा नक्षत्राच्या वेळी एक ग्लास पाणी घेऊन त्यात थोडी साखर टाकून पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन त्याच्या मुळाशी पाण्यात टाका. यासोबत ‘ओम ऐं ह्रीं श्री शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)