Saturn will be in Aquarius on 5th June: ५ जूनला कुंभ राशीमध्ये शनी होणार वक्री; जाणून घ्या कोणत्या राशीला होणार फायदा आणि कोणावर येणार संकटं

'या' राशीच्या जातकांसाठी शनिचे वक्री होणे हे शुभ संकेत आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. न्यायालयात वाद चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येण्याचे शुभ संकेत आहेत. धन लाभाचे संकेत आहेत.

Saturn will be in Aquarius on 5th June: ५ जूनला कुंभ राशीमध्ये शनी होणार वक्री; जाणून घ्या कोणत्या राशीला होणार फायदा आणि कोणावर येणार संकटं
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 8:37 PM

ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाच्या हालचाली आणि स्वभावाला विशेष महत्त्व आहे. शनि हा ग्रह कर्मफल देणारा म्हणून मान्यता आहे.  शनि ग्रहाचे बदल, अस्त, मार्गी आणि वक्री होण्याचा सर्वच राशींच्या जातकांवर विशेष प्रभाव पडतो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. शनी सुमारे अडीच वर्षे कोणत्याही राशीत राहतो आणि या काळात तो वक्री आणि मार्गी होतो. या महिन्यात 05 जून रोजी पहाटे 4 वाजता शनी वक्री होईल.

कुंभ राशीत शनि वक्री होण्याचे महत्त्व

29 एप्रिलपासून शनिदेव त्यांच्या दुसऱ्या स्वराशी म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहेत. मकर आणि कुंभ राशीवर शनिदेवाचे राज्य असते. कुंभ राशीत राहून शनी आता प्रतिगामी म्हणजेच वक्री वाटचाल करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हाही एखादा ग्रह स्वतःच्या राशीत असतो तेव्हा तो नेहमीच शुभ परिणाम देतो. तथापि, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह मागे पडतो, म्हणजेच तो विरुद्ध दिशेने जाऊ लागतो तेव्हा त्याचा संबंधित राशीच्या जातकांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. कामात अडथळे येतात. करिअरमधील अपयश आणि व्यवसायात तोटा अनुभवयास येतो. अनावश्यक खर्च वाढतो. परंतु हे सर्व जातकाच्या कुंडलीत शनिदेव कोणत्या घरात स्थित आहे यावर अवलंबून असते. शुभ घरात बसल्यास चांगले परिणाम आणि अशुभ घरात बसल्यास त्रास होतो.

हे सुद्धा वाचा

शनीच्या वक्री होण्याने कोणकोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहेत ते जाणून घेऊया

  1. मेष- 05 जून 2022 पासून जेव्हा शनि कुंभ राशीत वक्री झाल्यानंतर मेष राशीच्या जातकांसाठी शुभ आणि लाभदायक फळ देणारा असेल. कामातील अडथळे दूर होतील. योजना योग्य दिशेने पुढे जातील. तुम्हाला अर्थार्जनाच्या एकापेक्षा जास्त संधी मिळणार आहेत. तुम्ही केलेल्या कामाची समाजात स्तुती होईल. संतती सुख मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. करिअरमधील हा काळ तुमच्यासाठी शुभ संकेत देत देणारा असेल. कुंभ राशीतील शनि वक्री होणे हे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही.
  2. कन्या- कन्या राशीच्या जातकांसाठी शनिचे वक्री होणे हे शुभ संकेत आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. न्यायालयात वाद चालू असेल तर निर्णय तुमच्या बाजूने येण्याचे शुभ संकेत आहेत. धन लाभाचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून वक्री शनि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगल्या निकालाचे संकेत देत आहे. आजारी व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. सहलीसाठी बाहेर जाण्याचे योग आहेत. नवीन ओळखी होतील ज्याचा फायदा करियरमध्ये करून घेता येईल.
  3. धनु- धनु राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी वक्री होणे वरदानापेक्षा कमी नाही. तुम्हाला कमाईच्या चांगल्या संधी मिळतील. व्यवसायातील अडथळे आतापासून दूर होतील. चांगले यश मिळणे आतापासून सुरू होईल. करिअरला नवी उंची मिळेल. महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने येतील. नोकरीत पदोन्नती आणि आर्थिक लाभाचे चांगले संकेत आहेत. कुटुंबात सुसंवाद राहील.

या राशीच्या जातकांसाठी असेल अनिष्ठ काळ

  1. कर्क- जीवनात येणाऱ्या अडथळ्यांपासून सध्या तुमची सुटका होणार नाही. नोकरी शोधणाऱ्यांना काही दिवस अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाद वाढू शकतात. धनहानी देखील होऊ शकते. आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागेल.
  2. वृश्चिक- अचानक तुमच्या जीवनात अनावश्यक खर्च वाढू लागतील. मानसिक तणावामुळे तुमचा दिवस चांगला जाणार नाही. पैसे गुंतवताना काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. मतभेदावरून कुटुंबात वाद होऊ शकतात.
  3. मीन- शनीचे प्रतिगामी होणे तुमच्यासाठी शुभ संकेत नाही. व्यवसायात नुकसान होऊ शकते, याचा परिणाम तुमच्या भविष्यातल्या योजनांवर होऊ शकतो. तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे येतील ज्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. कोणालाही कर्ज देणे टाळा. अन्यथा तुमचे पैसे दीर्घकाळ अडकू शकतात.

(वरील माहिती जोतिष्यशास्त्राच्या दृष्टीने देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाही हेतू नाही)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.