स्वप्नात या गोष्टींचे पाहणे म्हणजे महादेवाच्या कृपेचे आहे स्पष्ट संकेत, होतील सर्व मनोकामना पुर्ण
स्वप्नात काही विशेष गोष्टी दिसणे हे देखील भगवान शंकराच्या आशीर्वादाचा वर्षाव होण्याचे लक्षण आहे. आज आपण स्वप्न शास्त्रामध्ये सांगितलेल्या त्या स्वप्नांबद्दल जाणून घेऊया, जे सूचित करतात की भगवान शिवाची तुमच्यावर कृपा आहे.
मुंबई : 2023 हे वर्ष भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्याच्या दृष्टीने खूप खास आहे. यंदा अधिक महिना असल्याने श्रावण महिन्याचे महत्व अधिकच वाढले आहे. भगवान भोलेनाथांचे (Bhagwan Shiv) आशीर्वाद घेण्यासाठी शिव भक्तांना पवित्र श्रावण (Shrawan 2023) महिन्याचा दुप्पट वेळ मिळेल. हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशी काही चिन्हे सांगितली आहेत ज्यावरून असे दिसून येते की, भगवान शिव तुमच्यावर कृपा करतात. स्वप्नात काही विशेष गोष्टी दिसणे हे देखील भगवान शंकराच्या आशीर्वादाचा वर्षाव होण्याचे लक्षण आहे. आज आपण स्वप्न शास्त्रामध्ये सांगितलेल्या त्या स्वप्नांबद्दल जाणून घेऊया, जे सूचित करतात की भगवान शिवाची तुमच्यावर कृपा आहे.
स्वप्नात नंदी बैल पाहणे
स्वप्नशास्त्र आणि धार्मिक शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात नंदी दिसला तर भगवान शिवाची तुमच्यावर कृपा आहे. यासोबतच तुम्हाला लवकरच काही मोठ्या कामात यश मिळणार आहे. नंदी हे भगवान शिवाचे गण असून त्यांचे वाहन आहे.
स्वप्नात त्रिशूल पाहण्याचा अर्थ
भगवान शिव त्रिशूल धारण करतात. रज, तम आणि सतगुण यांच्या संयोगाने त्रिशूल निर्माण झाल्याचे मानले जाते. जर तुम्हाला स्वप्नात त्रिशूल दिसले तर याचा अर्थ तुमचे सर्व संकट दूर होणार आहेत.
स्वप्नात डमरू पाहणे
भगवान शिव नेहमी डमरू धारण करतात, त्यामुळे स्वप्नात डमरू पाहणे खूप शुभ मानले जाते. हे जीवनातील समस्या आणि अडथळ्यांपासून दूर जाणे आणि चांगले भविष्य आणि आनंद आणि समृद्धी प्राप्त करणे सूचित करते.
स्वप्नात शिवलिंग पाहणे
शिवलिंग स्वप्नात पाहणे खूप शुभ मानले जाते. हे सांगते की भगवान शिवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुम्हाला लवकरच काही मोठे यश मिळू शकते. यासोबतच तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळू शकते. असे स्वप्न हे देखील सांगते की, तुमची काही मोठी स्वप्ने पूर्ण होऊ शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)