Shani Amavasya : आज शनि अमावस्येला 100 वर्षानंतर जुळून येतोय हा दूर्लभ योग, या राशीच्या लोकांनी राहावे सावध
या दिवशी सूर्य आणि बुध कन्या राशीमध्ये एकत्र असतील. त्याचबरोबर केतू आणि मंगळ देखील कन्या राशीत आहेत. ज्यामुळे राशीच्या लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. ग्रहण काळात राहूचा प्रभाव वाढतो. सर्वपित्री अमावस्या शनिवारी येत असून शनिवारी राहूचा प्रभाव द्विगुणित होतो.
मुंबई : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर सर्वपितृ अमावस्येला (Sarvapitru Amavasya 2023) म्हणजेच आज होणार आहे. सर्वपितृ अमावस्या शनिवारी येत असल्याने या दिवशी शनि अमावस्याही (Shani Amavasya 2023) असेल. वास्तविक, अमावस्या शनिवारी येत असल्याने याला शनि अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असेही म्हटले जाईल. अशा परिस्थितीत सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण होणे हा अत्यंत दुर्मिळ योगायोग असल्याचे म्हटले जाते. यापूर्वी सुमारे शंभर वर्षांपूर्वी सर्वपितृ अमावस्येला सूर्यग्रहण (Last Solar Eclipse 2023) झाले होते. शनि अमावस्या आणि सूर्यग्रहण या दुर्मिळ संयोगाचा प्रभाव काही राशींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
या दिवशी सूर्य आणि बुध कन्या राशीमध्ये एकत्र असतील. त्याचबरोबर केतू आणि मंगळ देखील कन्या राशीत आहेत. ज्यामुळे राशीच्या लोकांना त्रास होण्याची शक्यता आहे. ग्रहण काळात राहूचा प्रभाव वाढतो. सर्वपित्री अमावस्या शनिवारी येत असून शनिवारी राहूचा प्रभाव द्विगुणित होतो. अशा स्थितीत मेष, वृश्चिक आणि मीन राशींवर विपरीत परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
या राशीच्या लोकांना सावध राहाण्याची गरज
मेष
या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण नकारात्मक प्रभाव आणणार आहे. कामाच्या दबावामुळे तुम्हाला तणाव जाणवेल. कुटुंबातील एखादा सदस्य अस्वस्थ राहू शकतो. यामुळे मन खूप अस्वस्थ होणार आहे. कोणालाही उधार देऊ नका अन्यथा पैसे बुडू शकतात. नोकरदार लोकांची अचानक बदली होऊ शकते.
मिथुन
नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. काही नवीन काम सुरू करण्याचा विचार तुमच्या मनात येऊ शकतो, ज्याचे भविष्यात चांगले परिणाम मिळू शकतात. याशिवाय, तुमची आर्थिक स्थिती देखील यावेळी मजबूत राहील. कामाच्या ठिकाणीही बदलाची शक्यता आहे. या काळात तुमची काही आर्थिक समस्या असेल तर ती दूर होईल. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचा सूर्याशी मैत्रीचा भाव आहे. त्यामुळे हे ग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.
कर्क
सिंह राशीच्या लोकांवरही सूर्यग्रहणाचा मोठा प्रभाव पडेल. या ग्रहणामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात नशीब तुमची साथ देईल. यावेळी तुम्हाला तुमच्या आईकडून आनंद आणि सहकार्य मिळेल. जर तुम्ही वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्हाला नफा देईल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.
वृश्चिक
या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण अशुभ ठरणार आहे. व्यवसायात तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. कामानिमित्त तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. तो प्रवास अत्यंत हानीचा असणार आहे. सूर्यग्रहणाचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होणार आहे. तुम्ही रोगास बळी पडू शकता.
धनु
सूर्यग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. या काळात व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात नोकरीच्या संधी मिळतील आणि प्रगतीचे नवीन मार्गही उघडतील. तसेच, व्यवसायात मोठी डील निश्चित होऊ शकते. या कालावधीत तुम्हाला कर्ज दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय नोकरदारांनाही यावेळी रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि सूर्य यांच्यात मैत्रीची भावना आहे.
मीन
या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप नकारात्मक असणार आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणार आहे. खर्चामुळे मन खूप अस्वस्थ होईल. सूर्यग्रहणापासून चंद्रग्रहणापर्यंत बरीच धांदल उडणार आहे. विरोधकही वरचढ दिसतील. एखाद्यावर काळजीपूर्वक विश्वास ठेवा, अन्यथा नुकसान होऊ शकते. घरामध्ये काही मुद्द्यावरून कुटूंबासोबत वाद होऊ शकतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)