Shani Jayanti 2023 : ज्या राशीच्या लोकांना सुरू आहे साडेसाती आणि अडीचकी, त्या राशीच्या लोकांसाठी विशेष दिवस आहे शनि जयंती
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी पूजा आणि उपाय केले जात असले तरी वर्षातील एक दिवस खूप खास असतो, ज्या दिवशी शनिदेव आपल्या भक्तांना विशेष आशीर्वाद देतात.
मुंबई : शनिदेवाचा शनिदेवाला कर्माचा दाता म्हंटल्या गेले आहे. जर शनिदेवाची कृपा हवी असेल तर माणसाने आपले कर्म सुधारले पाहिजे कारण तो माणसाचा हिशेब त्याच्या कर्मानेच करतो. यामुळेच न्यायदेवता आणि कर्माचा दाता म्हणून ओळखला जातो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक शनिवारी पूजा आणि उपाय केले जात असले तरी वर्षातील एक दिवस खूप खास असतो, ज्या दिवशी शनिदेव आपल्या भक्तांना विशेष आशीर्वाद देतात. या दिवशी भगवान शनिदेवाचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवसाला शनि जयंती म्हणतात. यंदा शनि जयंती 19 मे (Shani Jayanti 2023) रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी होणार आहे. या दिवशी शनिदेवाची आराधना केल्याने त्यांचे वर्षभर आशीर्वाद मिळतात. विशेषत: शनीच्या साडेसातीचा प्रभाव असलेल्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे.
गरजूंना मदत करा
शनिदेव नेहमी अशा लोकांना आशीर्वाद देतात, जे गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. अशा लोकाना शनि दोषाचा त्रास होत नाही. याशिवाय जे लोक नेहमी चांगले काम करतात त्यांच्यावर शनिदेव खूप प्रसन्न असतात.
दान
काळी गाय, काळा कुत्रा आणि कावळे यांची सेवा करणारे लोकं शनिदेवाला आवडतात. याशिवाय शनि जयंतीच्या दिवशी मोहरीचे तेल, कच्चा कोळसा, लोखंडी भांडी, काळे कापड, काळी छत्री, काळे तीळ, काळे उडीद दान केल्याने ते प्रसन्न होतात.
रुद्राक्ष
याशिवाय भगवान शिव आणि हनुमानाची पूजा करणाऱ्यांना शनिदेव त्रास देत नाहीत. याउलट दर शनिवारी पीपळ आणि शमीच्या झाडाची पूजा करून सातमुखी रुद्राक्ष धारण केल्याने शनिदोष कमी होतो आणि साडेसाती व अडिचकीचा त्रास होत नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)