Shani Upay: शनीदेवाच्या प्रकोपापासून बचावासाठी आज करा हे सोपे उपाय, साडेसातीचा त्रासही होईल कमी

मौनी अमावस्येच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि सूर्य नारायण यांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा.

Shani Upay: शनीदेवाच्या प्रकोपापासून बचावासाठी आज करा हे सोपे उपाय, साडेसातीचा त्रासही होईल कमी
शनीदेवImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 11:59 AM

मुंबई, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावास्येला मौनी अमावस्या (Mauni Amavasya 2023) म्हणतात. यावेळी 21 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आज मौनी अमावस्या साजरी केली जात आहे. या दिवशी मौन बाळगण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी मौन पाळताना मन आणि वाणीवर संयम ठेवावा. याला शनैश्चरी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी मंत्रजप केल्याने सिद्धी प्राप्त करता येते. मौनी अमावस्येच्या दिवशी मनात कोणतेही चुकीचे विचार आणू नयेत. या दिवशी मंत्रांचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जाही संपते. मौनी अमावस्येच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि सूर्य नारायण यांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि त्यांच्या मंत्रांचा जप करावा.

मौनी अमावस्या विशेष का आहे?

अनेक वर्षांनी मौनी अमावस्या शनिवारी येत आहे. या दिवशी जप आणि तपश्चर्या केल्याने अक्षय फळ मिळते. या दिवशी शनिदेवाचीही पूजा करावी. ज्यांना साडेसाती आणि अडिचकीचा त्रास आहे त्यांनी या दिवशी दानधर्म अवश्य करावा. जेणेकरून सर्व ग्रह दोष दूर होतात. या दिवशी खीर बनवावी आणि आपल्या पूर्वजांना पत्रावळीवर अर्पण करावी.

शनिदेवाचा त्रास टाळण्यासाठी या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. दुसरीकडे शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा. शमीची पाने अर्पण करा. यासोबतच या दिवशी शनिदेवाला निळे फूल अर्पण करावे. घरामध्ये आर्थिक संकट असल्यास शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीला लाल फुले अर्पण करावीत. या दिवशी दान आणि सत्कर्म केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हे सुद्धा वाचा

मौनी अमावस्येला करा हे सोपे उपाय

  1.  मौनी अमावस्येच्या दिवशी गंगेत स्नान करावे. जर तुम्हाला या दिवशी गंगेत स्नान करता येत नसेल तर गंगाजलात मिसळून स्नान करावे.
  2. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करावे. या दिवशी पैसे, गाय, धान्य, तीळ, घोंगडी दान करू शकता.
  3. तुम्ही तुमच्या पितरांसाठी काही खास वस्तू दान करा. पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.
  4. या दिवशी गाईला चारा खाऊ घाला आणि पिठाचे गोळे करून माशांनाही खाऊ घाला.
  5. मौनी अमावस्येच्या दिवशी श्री हरी विष्णूसोबत भगवान शिवाचीही पूजा करावी. त्यावर तीळ मिसळलेले पाणी अर्पण करावे.

मौनी अमावस्येला काय करू नये

  1.  या दिवशी दारूचे सेवन करू नये.
  2.  लसूण, कांदा आणि मांसासारखे तामसिक अन्न सेवन करू नये.
  3. या दिवशी कोणाशीही भांडण करू नये. तुम्ही तुमचे मन शांत ठेवावे.
  4. मौनी अमावस्येच्या दिवशी खोटे बोलणे देखील टाळावे.

मौनी अमावस्या शुभ मुहूर्त

मौनी अमावस्या 21 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आज सकाळी 06:16 वाजता सुरू झाली आहे आणि 22 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच उद्या रात्री 02:22 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार, मौनी अमावस्या 21 जानेवारीला म्हणजेच आजच आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.