Shanidev : शनिदेवाला अप्रिय आहेत या सहा सवयी, यशस्वी होण्यासाठी लगेच करा त्याग

हिंदू पौराणिक कथा मूलत: शनिदेवाला (Shanidev) प्रसन्न करण्यासाठी आयुष्यभर चांगले कर्म करावे लागतात. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही शनिदेवाची कृपा प्राप्त करू शकता.

Shanidev : शनिदेवाला अप्रिय आहेत या सहा सवयी, यशस्वी होण्यासाठी लगेच करा त्याग
शनिदेव उपायImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 8:19 PM

मुंबई : शनिदेवाला न्याय देवता म्हणून ओळखले जाते, आणि हिंदू लोकं जीवनातील वाईट आणि अडथळे दूर करण्यासाठी प्रार्थना करतात. सूर्याचा पुत्र, शनिदेव, हिंदू पौराणिक कथांनुसार, लोकांना त्यांच्या कृत्यांसाठी शुभ भळ देतात. यम, जो सूर्याचा पुत्र देखील आहे. असे मानले जाते की ज्यांच्यावर शनिदेव प्रसन्न होतात ते जीवनातील सर्व लक्ष्य साध्य करू शकतात. हिंदू पौराणिक कथा मूलत: शनिदेवाला (Shanidev) प्रसन्न करण्यासाठी आयुष्यभर चांगले कर्म करावे लागतात. असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही शनिदेवाची कृपा प्राप्त करू शकता. एकीकडे जिथे काही उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, तर दुसरीकडे अशी काही कामे किंवा सवयी आहेत ज्यामुळे शनिदेव नाराज होतात. अशा स्थितीत शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेऊया.

चुकूनही करू नका हे काम

  • ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांचे स्नानगृह नेहमी अस्वच्छ असते, त्यांना शनिदेवाच्या नाराजीला समोर जावे लागते. म्हणूनच नेहमी बाथरूम वापरल्यानंतर ते अजिबात अस्वच्छ ठेवू नये.
  • वडिलधाऱ्यांचा, लाचारांचा आणि ज्येष्ठांचा अनादर केल्याने शनिदेवही कोपतात. यापैकी कोणाचाही अपमान केल्यास शनिदेवाच्या वक्रदृष्टीला सामोरे जावे लागते.
  • जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील आणि ते जाणूनबुजून परत करत नसाल तर तुम्हाला शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो. अशा लोकांच्या जीवनात शनि अनेक समस्या निर्माण करतो. त्यामुळे तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते लवकरात लवकर फेडावे.
  • पाय ओढणाऱ्यांवर शनिदेवाचा कोप राहतो. त्यामुळे अनेकदा त्यांची तयार केलेली कामेही खराब होतात आणि त्याशिवाय त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो.
  • ज्या लोकांना बसताना पाय हलवण्याची सवय असते त्यांनाही शनिदेवाच्या नाराजीचा सामना करावा लागतो. विनाकारण पाय हलवण्याची ही सवय खूप वाईट मानली जाते, यामुळे माणसाच्या आयुष्यात तणाव वाढतो.
  • जर तुम्हाला स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवण्याची सवय असेल तर ती लगेच दुरुस्त करा. ज्योतिषशास्त्रात याला अशुभ मानले जाते आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते. स्वयंपाकघरात ठेवलेल्या खरकट्या भांड्यांमुळे शनिदेव कोपतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.