Shanishchari Amavasya 2023: शनिश्चरी अमावस्येला चुकूनही करू नका हे काम, भोगावे लागतील वाईट परिणाम!
धार्मिक मान्यतेनुसार शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी अशी काही कामे आहेत जी टाळावी अन्यथा शनिदेव क्रोधित होतात आणि शुभ फळ मिळत नाही.
मुंबई, माघ महिन्यात येणारी यावर्षीची पहिली अमावस्या 21 जानेवारीला शनिवारी येत आहे. माघ महिन्यातील अमावस्याला मौनी अमावस्या असे म्हणतात आणि त्या दिवशी शनिवार असल्याने तिला शनिश्चरी अमावस्या (Shanishchari Amavasya 2023) असेही म्हणतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये शनिश्चरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मौनी अमावस्येच्या दिवशी शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत असतील आणि त्यामुळे शनिश्चरी अमावस्येचे महत्त्व वाढते.
शनिश्चरी अमावस्येला करू नये हे काम
धार्मिक मान्यतेनुसार शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी अशी काही कामे आहेत जी टाळावी अन्यथा शनिदेव क्रोधित होतात आणि शुभ फळ मिळत नाही. पौराणिक मान्यतेनुसार, शनिदेव हा एक प्रभावी ग्रह मानला जातो जो व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतो आणि कुंडलीत शनिदेवाचे स्थान खूप प्रभावी आहे. अशा परिस्थितीत शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी हे काम करू नये.
असहाय्य आणि दुर्बलांना त्रास देऊ नका
शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी असहाय्य, गरीब, अपंग लोकांना कधीही त्रास देऊ नये. याशिवाय शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी या असहाय्य लोकांना मदत केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि जीवनात आनंद येतो.
शनिश्चरी अमावस्येला बूट खरेदी करू नका
शनिवारी कधीही चपला खरेदी करू नका. शनिश्चरी अमावस्येला पादत्राने खरेदी केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. असे केल्याने राशीच्या कुंडलीत शनि दोष तयार होतो.
घरी तेल आणि लोखंड खरेदी करू नका
शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी तेल आणि लोखंड खरेदी करून घरी आणू नये. त्यामुळे घरातील गरिबी वाढते. शनिवारी तेल आणि लोहाचे दान करणे शुभ असते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)