Shaniwar Upay : कोर्ट कचेरीचे प्रकरण लागेल मार्गी, शनिवारी अवश्य करा हे उपाय
ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला (Shanidev) कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते.
मुंबई, शनिवार (Shaniwar Upay) हा हिंदू धर्मात खूप विशेष दिवस मानला जातो. हा दिवस शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपवास करतात. शनिवारी काही खास उपाय करून तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करू शकता. विशेषतः कोर्ट कचेरीतले अडकलेले प्रकरण या उपायांमुळे मार्गी लागते.
शनिवारी करा हे प्रभावी उपाय
1. शनिवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करा आणि नियमानुसार भगवान शनिदेवाची पूजा करा. 2. या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्यात काळे तीळ जरूर टाका. त्यामुळे भविष्य उज्ज्वल होते. 3. पिंपळाच्या झाडाभोवती 7 वेळा प्रदक्षीणा घाला. या दरम्यान ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. यामुळे शनिदेवाची कृपा राहते. 4. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली गोल दिवा लावा. असे मानले जाते की यामुळे घरात धन, प्रसिद्धी आणि भाग्याची कमतरता नसते. 5. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या व्यवसायात काही नुकसान होत असेल तर शनिवारी पिंपळाच्या 11 पानांपासून हार बनवा आणि मंदिरात जाऊन शनिदेवाला अर्पण करा. यामुळे तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. 6. कोर्टाच्या त्रासातून सुटका हवी असेल तर मंदिरात जाऊन शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. यादरम्यान ‘ओम श्रीं शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करत राहा. 7. कुंडलीतील राहू-केतूशी संबंधित दोष दूर करण्यासाठी शनिदेवावर स्वार असलेल्या काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घाला. राहू-केतू दोष दूर करण्याचा हा एक प्रभावी उपाय आहे. 8. शनिवारी शनि यंत्राची पूजा करणे देखील लाभदायक आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)