Shaniwar Upay: शनिवारच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे मिळेल त्रासातून मुक्ती, साडेसातीचा प्रभावही हाेईल कमी

या उपायांमुळे तुम्हाला कोर्ट-कचेरीत यश मिळेल, व्यवसायातही प्रगती होईल.

Shaniwar Upay: शनिवारच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे मिळेल त्रासातून मुक्ती, साडेसातीचा प्रभावही हाेईल कमी
शनिदेव Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 9:18 AM

मुंबई, आज, शनिवार (Shaniwar Upay) हा कर्माचा दाता शनिदेवाच्या पूजेचा दिवस आहे. या दिवशी तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवू शकता. शनीदेवाच्या उपासनेमुळे अनेक त्रासातून मुक्ती मिळते.  या उपायांमुळे तुम्हाला कोर्ट-कचेरीत यश मिळेल, व्यवसायातही प्रगती होईल. जे लोक लोखंडाशी संबंधित व्यवसायात आहेत त्यांनी शनिवारी उपाय करावे कारण लोह हा शनिदेवाचा प्रिय धातू आहे.

जाणून घेऊया शनिवारचे उपाय

  1.  शमीची पाने शनिदेवाला प्रिय आहे. शनिवारी या रोपाला पाणी द्या आणि त्याची सेवा करा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि घरात धनाचे आगमन होईल.
  2.  शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. त्यानंतर एक कच्चा धागा घेऊन झाडाला सात वेळा गुंडाळा. शनिदेवाचे स्मरण करा आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी त्यांची प्रार्थना करा.
  3.  जर तुम्हाला शनिदोष, साडेसाती किंवा अडिचकीचा त्रास होत असेल तर तुम्ही शनिदेवाच्या बीज मंत्राचा ओम ऐं ह्रीं श्री शनैश्चराय नमःचा किमान 108 वेळा किंवा एक जपमाळ जप करावा. शनि मंदिरात जाऊन या मंत्राचा जप केल्यास उत्तम परिणाम मिळतील.
  4.  शनिवारी उपवास करणे आणि शनिदेवाची पूजा करणे खूप फायदेशीर आहे. पूजेच्या वेळी शनिवार व्रत कथा वाचावी. यामुळे तुमचे ग्रह दोषही दूर होतील आणि तुमचे संकटही दूर होतील.
  5. वाईट संगत आणि वाईट व्यसन सोडणे हा सर्वात माेठा उपाय आहे. जुगार, दारू, चोरी, व्यभिचार यांसारख्या वाईट गोष्टी सोडून द्या. असहाय लोकांना मदत करा.
  6.  जाणूनबुजून किंवा नकळत तुम्ही असहाय लोक, स्त्रिया, मुलं यांना दुखावत असाल किंवा ते कावळा, कुत्रा, गाय यासह इतर प्राण्यांना त्रास देतात. जर तुम्ही वडिलधाऱ्यांचा अपमान करत असाल तर लगेच या सवयी सोडा. त्या दिवसापासून तुमचा शनि सकारात्मक प्रभाव देऊ लागेल.
  7. कपाळावर लाल चंदनाचा तिलक लावा आणि दर शनिवारी हनुमान चालिसाचा पाठ करा. तुम्हाला शनीच्या त्रासातून आराम मिळेल आणि जीवनात प्रगतीचा मार्ग खुला होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.