Shardiya Navratri 2023 : या तारखेपासून होणार शारदीय नवरात्रीला सुरूवात, असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

Shardiya Navratri 2023 पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीमध्ये, महिषासुराचे माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांसोबतचे युद्ध 9 दिवस चालले होते. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

Shardiya Navratri 2023 : या तारखेपासून होणार शारदीय नवरात्रीला सुरूवात, असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त
शारदीय नवरात्रीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 26, 2023 | 6:13 PM

मुंबई : अश्विन महिन्यात शारदीय नवरात्री साजरी केली जाते. माता दुर्गेचे भक्त या नवरात्रीची आतुरतेने वाट पाहतात. शारदीय नवरात्रीमध्ये (Shardiya Navratri 2023) देवीच्या नऊ रूपांना प्रसन्न करण्यासाठी पूजा, गरबा, कन्यापूजा, जागरता आदी नऊ दिवस केले जातात. ठिकठिकाणी पंडाळे लावून देवीची स्थापना केली जाते. यावर्षी शारदीय नवरात्र रविवार, 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होत आहे. माता दुर्गाला समर्पित हा उत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि मंगळवार, 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल. विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजाविधी केली जाते. देवी सिंहाची स्वारी करत असली तरी नवरात्रीच्या काळात ती पृथ्वीवर आल्यावर तिचे वाहन बदलते. माता जगदंबेच्या आगमनाची तारीख नवरात्रीच्या सुरुवातीच्या दिवसावर अवलंबून असते. म्हणजेच ज्या दिवशी नवरात्रीची सुरुवात होते त्या दिवसाच्या आधारावर त्यांचे वाहन ठरते. यंदा देवीचे वाहन हत्ती असणार आहे.

शारदीय नवरात्र 8 किंवा 9 दिवस?

या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होईल आणि 23 ऑक्टोबर 2023 रोजी संपेल. 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीला देवीच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. अशा स्थितीत शारदीय नवरात्री पूर्ण 9 दिवस साजरी होणार आहे. यावर्षी कोणत्याही तिथीचा क्षय झालेला नाही. शास्त्रानुसार नवरात्रीमध्ये तिथी येणे अशुभ मानले जाते.

शारदीय नवरात्री 2023 घटस्थापना मुहूर्त

पंचांगानुसार, शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 11.24 वाजता सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 12.03 वाजता समाप्त होईल. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्र पठण आणि वैदिक विधींसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते, याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापना केवळ शुभ मुहूर्तावर केले जाते, यामुळे देवी दुर्गा घरात 9 दिवस निवास करते. कलश स्थापना मुहूर्त – सकाळी 11.44 ते दुपारी 12.30 असणार आहे.

हे सुद्धा वाचा

2023 मध्ये महाष्टमी कधी आहे?

नवरात्रीच्या आठव्या दिवशी महाष्टमीचा उपवास केला जातो. तिला दुर्गाष्टमी असेही म्हणतात. यावर्षी शारदीय नवरात्रीतील महाष्टमी 22 ऑक्टोबर 2023 रोजी आहे. या दिवशी माता महागौरीची पूजा, कुलदेवीची पूजा आणि कन्या पूजा करण्याची परंपरा आहे.

शारदीय नवरात्रीचे महत्त्व का आहे?

पौराणिक कथेनुसार, अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीमध्ये, महिषासुराचे माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांसोबतचे युद्ध 9 दिवस चालले होते. दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला, तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.नवरात्रीच्या काळात माता दुर्गा पृथ्वीवर येते आणि तिच्या सर्व भक्तांना आशीर्वाद देते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...