नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्यापूर्वी बोला ‘हा’ शब्द, मनोकामना लवकर होईल पूर्ण

नंदी भगवान शिवांचा प्रिय भक्त आहे. त्यामुळे जिथे जिथे शिव तिथे तिथे तुम्हाला नंदीचं वास्तव्य पाहायला मिळेल. भक्तगण आपली इच्छा नंदिच्या कानात सांगतात. पण इच्छा एक शब्द उच्चारून केल्यास लवकर पूर्ण होते.

नंदीच्या कानात आपली इच्छा सांगण्यापूर्वी बोला 'हा' शब्द, मनोकामना लवकर होईल पूर्ण
शिवासमोरील नंदीला आपली मनोकामना सांगताना हा शब्द उच्चारा, झटपट सापडेल मार्ग
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 3:14 PM

मुंबई : भगवान शिव हे लवकर प्रसन्न होणारे दैवत असल्याने त्यांना भोलेनाथ संबोधलं जातं. पण तुम्ही कधी शिवमंदिरात गेला असाल तर एक बाब तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे पहिल्यांदा नंदीचं दर्शन घ्यावं लागतं. नंदी भगावान शंकरांच्या प्रमुख गणांपैकी एक आहेत. इतकंच काय तर कैलास पर्वताचे द्वारपाल म्हणून भूमिका बजावतात, अशी मान्यता आहे. म्हणजेच जिथे जिथे भगवान शिव तिथे तिथे नंदी तुम्हाला पाहायला मिळतील. भगवान शिवाने नंदीला वरदान दिलं आहे की जिथे जिथे माझं स्थान असेल तिथे तू असशील. त्यामुळे भक्तगण आपली इच्छा नंदीच्या कानात सांगतात. पण आपली इच्छा व्यक्त करताना काही शब्द उच्चारणं गरजेचं आहे.

हिंदू शास्त्रानुसार, भगवान शिव जास्तीत जास्त काळ तपस्येत लीन असतात. तेव्हा त्यांच्या तपस्येत कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून फक्त नंदी तिथे विराजमान असतात. त्यामुळे नंदी भगवान शंकराना तपस्येतून जागे झाल्यानंतर भक्तांची इच्छा सांगतात. ही प्रथा हजारो वर्षांपासून सुरु आहे.

दुसरीकडे, भगवान शंकरांनी नंदीला वरदान दिलं आहे की, जो भक्त तुझ्या कानात मनोकामना सांगेल त्याची इच्छा पूर्ण करेन. म्हणून शिव भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात.

शास्त्रानुसार नंदीच्या कानात कोणतीही इच्छा सांगण्यापूर्वी ‘ॐ’ हा शब्द उच्चारला पाहीजे. त्यानंतर आपली इच्छा सांगणं गरजेचं आहे. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, ॐ हा शब्द उच्चारण्यामागे हेतू काय? चला जाणून घेऊयात या मागचं कारण

हिंदू धर्मात ॐ या शब्दाचं विशेष असं महत्त्व आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक मंत्रांची सुरुवात ही ॐ या शब्दाने होते. ब्रह्मांडात ॐ या शब्दाचा नाद होत असतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात येतो आणि सकारात्मक उर्जेचा विकास होतो. तसेच ॐ हा शब्द सर्व देवी देवतांचं एक संयुक्त रुप आहे. त्यामुळे कोणतीही इच्छित मनोकामना बोलण्यापूर्वी ॐ या शब्दाचा उच्चार करणं आवश्यक आहे.

नंदी भगवान शिवांचा प्रिय कसा बनला?

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनावेळी जेव्हा विष बाहेर पडले. तेव्हा ते भगवान शिवांनी आपल्या वाटेला घेतलं. काही क्षणात ते प्राशन केलं. तेव्हा त्यांना निळकंठ असं नाव पडलं. विष प्राशन करत असताना त्यातील काही थेंब जमीनीवर पडले तेव्हा नंदीने ते चाटले. तेव्हा नंदीचं प्रेम आणि भक्ती पाहून शिव प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी मंदिरात समोर बसण्याचे वरदान दिले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.