Shivpuran : मृत्यूच्या आधी माणसाला मिळतात हे पाच संकेत, शिवपूराणात दिली आहे माहिती
मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू येण्याआधी नेमके काय घडते? शिवपूराणानुसार मृत्यू येण्याआधी काही संकेत मिळतात. जाणून घेऊया ते संकेत कोणते आहेत.
मुंबई : शिव महापुराणात भगवान शिवाने जीवन आणि मृत्यू या दोन्हींशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला जन्म आणि मृत्यूशी संबंधित रहस्ये जाणून घेण्यात खूप रस असतो. शिवपुराणात (Shivpuran) अशा लक्षणांचा उल्लेख आहे जी एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूपूर्वी दिसतात. ही लक्षणे पाहून त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे, हे समजू शकते. मृत्यूशी संबंधित या चिन्हे भगवान शिवाने माता पार्वतीला सांगितल्या होत्या.
शरीर निळसर होणे
शिवपुराणानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मरणार असते तेव्हा अचानक त्याचे शरीर निळे पडू लागते. किंवा अशा व्यक्तीच्या शरीरावर लाल चट्टे उमटतात. अशा व्यक्तीकडे फक्त 6 महिने उरलेले असतात. म्हणजेच 6 महिन्यांत त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते.
शरीराचे हे अवयव काम करणे बंद करतात
शिवपुराणात सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे काही भाग काम करणे थांबवतात, तेव्हा अशा व्यक्तीकडे खूप कमी वेळ उरतो. जर एखाद्या व्यक्तीचे तोंड, कान, डोळा, जीभ नीट काम करत नसेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, तो साधारण 6 महिन्यांत मरू शकतो.
तोंड कोरडे पडणे
अनेकवेळा तुम्ही पाहिले असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत थरथर कापतो किंवा शरीराचा कोणताही भाग थरथर कापू लागतो. परंतु, जर एखाद्या व्यक्तीचा डावा हाताला मुंग्या आल्या किंवा तोंडाच्या आतल्या टाळूचा वरचा भाग कोरडा होऊ लागला, तर अशा व्यक्तीकडे अगदी कमी वेळ असतो, सुमारे 1 महिना.
सावली दिसणे बंद होते
ज्या व्यक्तीची मृत्यूची वेळ जवळ येते, ती व्यक्ती पाणी, तेल, तूप किंवा आरशात आपले प्रतिबिंब पाहणे बंद करते. शिवपुराणानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती सावली पाहणे थांबवते. त्यामुळे अशा व्यक्तीकडे फार कमी वेळ असतो.
चंद्र काळा दिसतो
शिवपुराणात सांगितले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ जवळ येऊ लागते तेव्हा त्या व्यक्तीला चंद्र आणि तारे नीट दिसत नाहीत. अशा व्यक्तीकडे फक्त 1 महिन्याचा कालावधी शिल्लक असतो.