Shravan 2022: तामिळनाडूतील 1200 वर्षे जुने शिवमंदिर, ज्याचे रहस्य वैज्ञानिकांनाही कळू शकले नाही

हादेव आणि त्यांच्या प्राचीन मंदिराबद्दल आपण जाणून घेउया. आज ज्या मंदिराबद्दल आपण जाणून घेणार आहोत ते चोल वंशाच्या राजाने बांधले होते. तमिळनाडूतील तंजोर येथे असलेले हे बृहदेश्वर मंदिर आहे.

Shravan 2022: तामिळनाडूतील 1200 वर्षे जुने शिवमंदिर, ज्याचे रहस्य वैज्ञानिकांनाही कळू शकले नाही
शिव मंदिर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 1:54 PM

श्रावण (Shrawan 2022) हा हिंदू धर्मातील पवित्र महिना आहे. याशिवाय भगवान शिवाचा हा आवडता महिना आहे. अनेक शिवभक्त या महिन्यात तीर्थस्थळी दर्शनासाठी जातात. महादेवाचे असे अनेक मंदिरं आहेत जे अत्यंत प्राचीन, अद्भुत आणि रहस्यमयी आहे. या मंदिरात भगवान शिवाचे वास्तव्य असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यानिमित्याने महादेव आणि त्यांच्या प्राचीन मंदिराबद्दल आपण जाणून घेउया. आज ज्या मंदिराबद्दल (Shiv temple) आपण जाणून घेणार आहोत ते चोल वंशाच्या राजाने बांधले होते. तमिळनाडूतील तंजोर येथे असलेले हे बृहदेश्वर मंदिर (Brihadeshwara Temple) आहे. हे मंदिर  राजराजेश्वरम आणि थंजई पेरिया कोविल म्हणून देखील ओळखले जाते.  जागतिक वारसा स्थळ म्हणून या मंदिराची दाखल घेतलेली आहे. बृहदेश्वर मंदिर रहस्यांनी भरलेले आहे. जे आजतागायत शास्त्रज्ञ शोधू शकलेले नाहीत.

ग्रॅनाइटचे मंदिर बनलेले आहे

बृहदेश्वर मंदिर 1003-1010 मध्ये चोल शासक महाराजा राजाराज प्रथमच्या काळात बांधले गेले.  राजाराज हे महादेवाचे भक्त होते. त्यामुळे त्यांनी अनेक शिवमंदिरे बांधली होती. बृहदेश्वर मंदिर ग्रॅनाईटचे आहे. हे भव्यता, वास्तुकला आणि घुमटासाठी प्रसिद्ध आहे.

हे सुद्धा वाचा

पाया नसलेले मंदिर

हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून याला 13 मजले आहेत. त्याची उंची सुमारे 66 मीटर आहे. हे अवाढव्य मंदिर हजारो वर्षांपासून पायाशिवाय उभे आहे. एवढी वर्षे ते पायाशिवाय कसे तग धरून राहिली हे एक गूढच आहे.

80 टन सोन्याचा कलश

बृहदेश्वर मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वरचा सोन्याचा कलश. ज्या दगडावर हा सोन्याचा कलश आहे. त्याचे वजन 80 टन आहे. आता एवढा वजनदार दगड मंदिराच्या शिखरावर कसा नेला गेला असेल? ते एक गूढच आहे. या घुमटाची सावली जमिनीवर पडत नाही असे म्हणतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.