Shravan 2022: महाभारत काळातील कौलेश्वरी शिव मंदिर, जिथे पांडवांनी केली होती महादेवाची पूजा

अज्ञातवासात असताना पांडवांनी या मंदिरात महादेवाची पूजा केली होती. सुमारे 2 हजार फूट उंचीवर असलेल्या कौलेश्वरी पर्वताच्या शिवमंदिरात जलाभिषेकासाठी नैसर्गिक तलाव आहे. येथे भाविक स्नान करून महादेवाला अभिषेक करतात.

Shravan 2022: महाभारत काळातील कौलेश्वरी शिव मंदिर, जिथे पांडवांनी केली होती महादेवाची पूजा
कौलेश्वरी मंदिर जेथे पांडवांनी केली होती पूजा Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 9:51 AM

कौलेश्वरी पर्वत हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनासाठी ओळखले जाते. हे ठिकाण कौलेश्वरी देवीचे (Kauleshwari Devi) दिव्य दर्शन आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. पर्वताच्या शिखरावर महाभारत (Mahabharat) काळातील भोलेनाथाचे मंदिर असल्याचे मानले जाते. अज्ञातवासात असताना पांडवांनी या मंदिरात महादेवाची पूजा केली होती. सुमारे 2 हजार फूट उंचीवर असलेल्या कौलेश्वरी पर्वताच्या शिवमंदिरात जलाभिषेकासाठी नैसर्गिक तलाव आहे. येथे भाविक स्नान करून महादेवाला अभिषेक करतात. शिवमंदिरात दर सोमवारी विशेष भजन-कीर्तन होते. सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु आहे. 29 जुलैपासून मराठी म्हणजेच महाराष्ट्रीयन लोकांचा श्रावण महिना सुरू होतोय. श्रावणात महादेवाच्या दर्शनाला जाण्याला आणि अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात अनेक जण प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी जातात. या निमित्याने TV9 मराठी सातत्याने देशातील प्रसिद्ध मंदिराविषयी माहिती देत आहे.

माता कौलेश्वरी आहे भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र

पौराणिक कथेनुसार, महाभारत काळात ही राजा विराटची राजधानी होती. राजा विराटने माता कौलेश्वरीची मूर्ती बसवली होती. तेव्हापासून देवी कौलेश्वरी हे श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. बौद्ध धर्मासाठी हा पर्वत भगवान बुद्धांच्या तपोभूमीसह मोक्षप्राप्तीचे ठिकाण आहे. डोंगरात बौद्ध भिक्खूंच्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत.

येथे झाला होता अभिमन्यू-उत्तरा विवाह

कौलेश्वरी शिव मंदिराचा इतिहास महाभारत काळापासूनचा आहे. मंदिराशेजारी असलेल्या मांडवा मंडईत अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूचा विवाह राजा विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी झाला होता अशी आख्यायिका आहे.

रिकाम्या हाताने येतात भाविक

कौलेश्वरी पर्वताच्या शिवमंदिरात जलाभिषेक करण्यासाठी भाविकांना काहीही घेऊन जाण्याची गरज नाही. मंदिराभोवतीच पूजेचे साहित्य उपलब्ध आहे. स्थानिक नागरिक मंदिराच्या आवारातून फुले, बेलची पाने आणि पाणी विकत घेऊन महादेवाला अर्पण करतात.

हे सुद्धा वाचा

मंदिराचे वैशिष्ट्य

पौराणिक मान्यतेनुसार, पांडवांनी अज्ञातवासात असताना या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली होती अशी आख्यायिका आहे. याशिवाय भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनीसुद्धा वनवासाच्या काळात या मंदिरात वेळ घालविल्याचे सांगण्यात येते. भगवान शंकराच्या पूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात दर सोमवारी भाविक भजन-कीर्तन करतात.

चतरा येथील कौलेश्वरी पर्वतावर एक तलाव असून भोलेनाथाच्या अभिषेकासाठी भक्त येथून पाणी नेतात. कोलुआ पर्वतावर वसलेल्या या भोलेनाथाच्या मंदिरात भाविकांना बाहेरून काहीही आणण्यास मनाई आहे कारण मंदिराजवळच पूजेचे साहित्य उपलब्ध आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.