Shravan 2022: उद्या श्रावण महिन्यातली कालाष्टमी,अशी करा भगवान भैरवाची पूजा
हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी (Kalashtami) साजरी केली जाते. कालाष्टमीच्या दिवशी भगवान काल भैरवाची (Kal Bhairav) पूजा केली जाते. या वेळी श्रावण महिन्याची कालाष्टमी तारीख 20 जुलै 2022 ला आहे, या दिवशी गुरुवार येत आहे. हिंदू देवतांमध्ये बाबा भैरवाला खूप महत्त्व आहे. भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा आणि जगाचे रक्षण करणारा. […]
हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी (Kalashtami) साजरी केली जाते. कालाष्टमीच्या दिवशी भगवान काल भैरवाची (Kal Bhairav) पूजा केली जाते. या वेळी श्रावण महिन्याची कालाष्टमी तारीख 20 जुलै 2022 ला आहे, या दिवशी गुरुवार येत आहे. हिंदू देवतांमध्ये बाबा भैरवाला खूप महत्त्व आहे. भैरव म्हणजे भीतीचा पराभव करणारा आणि जगाचे रक्षण करणारा. कालाष्टमी व्रताच्या दिवशी भगवान शंकराच्या भैरव रूपाची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. कालभैरवाची पूजा किंवा स्मरण केल्याने सर्व प्रकारचे दोष, पाप आणि दुःख दूर होतात, अशी मान्यता आहे. काल भैरवाची पूजा केल्याने घरात नकारात्मक शक्ती, चेटूक, भूत इत्यादींचे भय राहत नाही असे म्हणतात. तसेच त्यांची पूजा केल्याने मनुष्याचा आत्मविश्वास वाढतो. कालाष्टमीच्या दिवशी भगवान काल भैरवाची उज कशी कारवी आणि त्याचे महत्त्व काय याबद्दल जाणून घेऊया.
भगवान कालभैरवाची उपासना पद्धत
कालाष्टमीच्या दिवशी भगवान शंकराच्या भैरव रूपाची पूजा करणे विशेष फलदायी असते. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे लवकर उठून दैनंदिन कामे करावीत व स्वच्छ वस्त्र परिधान करावेत. भैरवाला प्रसन्न करण्यासाठी उडीद डाळ किंवा त्यापासून बनवलेली मिठाई जसे की इमरती, गोड खीर किंवा दूध आणि काजू अर्पण करा. तसेच चमेलीचे फूल त्यांना खूप प्रिय आहे. पौराणिक मान्यतेनुसार भैरवजींचे वाहन श्वान आहे, त्यामुळे या दिवशी काळ्या श्वानाला गोड पदार्थ खाऊ घातल्याने भैरवाचा आशीर्वाद मिळतो. असे केल्याने तुमच्या आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्तींचा अंत होतो. यासोबतच आर्थिक संकटातूनही दिलासा मिळतो.
कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाच्या पूजेबरोबरच भगवान शिव, माता पार्वती आणि शिव परिवाराचीही पूजा करावी. भगवान कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी कालभैरवाष्टकाचे पठण करावे, असे केल्याने रोग दूर होतात. पूजेच्या शेवटी कालभैरवासमोर चतुर्मुखी दिवा लावावा आणि धूप-दीपाने आरती करावी.
कालाष्टमीचे महत्व
असे मानले जाते की बाबा कालभैरव सर्व प्रकारचे संकट दूर करतात. अशा स्थितीत कालाष्टमीच्या दिवशी उपवास करून कालभैरवाची पूजा केल्याने भक्तांना कोणत्याही प्रकारचे भय, रोग, शत्रू आणि मानसिक तणावापासून मुक्ती मिळते. यासोबतच भगवान काल भैरव तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादविवाद, न्यायालयीन खटल्यातून मुक्त होण्यास मदत करतात. धार्मिक शास्त्रानुसार त्यांची पूजा केल्याने राहू केतूच्या वाईट दोषांपासूनही मुक्तता मिळते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)