Shravan Somwar 2022: उद्यापासून सुरु होतोय श्रावण महिना; श्रावण सोमवारच्या तारखा आणि शिवमूठ
श्रावण मासामध्ये निसर्ग देखील बहरून निघतो व या महिन्यातील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे असते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळागौर, पोळा असे अनेक सण येतात.
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा पवित्र महिना भगवान शंकराला समर्पित असतो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. या वर्षी श्रावण मास किंवा श्रावण महिना उद्या 29 जुलैपासून सुरू होत आहे (Shrawan somwar 2022 date) आणि श्रावणाचा शेवटचा दिवस 27 ऑगस्ट रोजी येईल. हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण हा पाचवा महिना असतो. यंदा श्रावण, विषकुंभ आणि प्रीति योगात होत आहे. या महिन्यामध्ये येणारे विविध सण आपल्याला आनंदीत करतात तसेच या सणांमुळे आपापसातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. तसेच हा महिना अत्यंय हर्षोउल्हासात जातात. श्रावण मासामध्ये निसर्ग देखील बहरून निघतो व या महिन्यातील नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे असते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन, मंगळागौर, पोळा असे अनेक सण येतात. शिवमुठच्या व्रताने दर सोमवारी तांदुळ, तीळ, मुग, जवस आणि सातु अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात.
श्रावण सोमवारच्या तारखा आणि शिवमूठ
- यंदा पहिला श्रावण सोमवार (First shravan somwar 2022) हा 1 ऑगस्ट रोजी येणार आहे. या दिवशीचे शिवपूजन शिवामूठ तांदूळ आहे. याशिवाय याच दिवशी विनायक चतुर्थी असल्याने अत्यंत शुभ दिवस आहे.
- दुसरा श्रावण सोमवार 8 ऑगस्टला येणार आहे. यादिवशीशी शिवपूजन शिवमूठ तीळ आहे. यादिवशी पुत्रदा एकादशीसुद्धा आहे.
- तिसरा श्रावण सोमवार 15 ऑगस्टला येणार आहे. या दिवशीची शिवपूजन शिवमूठ मूग आहे. याच दिवशी संकष्ट चतुर्थी असून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनसुद्धा आहे.
- चौथा श्रावण सोमवार 22 ऑगस्टला येतोय. या सोमवारची शिवपूजन शिवमूठ जव आहे. या दिवशी एकादशीसुद्धा आहे.
या दिवशी तोडू नये बेलची पाने
चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलची पाने तोडू नयेत. तसेच संक्रांतीच्या काळात आणि सोमवारी बेलची पाने तोडू नयेत. यासाठी डहाळीसह बेलपत्रही तोडू नये. डहाळीहून निवडून केवळ बेलपत्र तोडले पाहिजे, कधीही पूर्ण डगाळ तोडू नये. पत्री तोडताना झाडाला हानी होता कामा नये. बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनात प्रणाम करावे. महादेवाला बेलपत्र नेहमी उलटं अर्पित करावं अर्थात पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा. बेलपत्रात चक्र आणि वज्र नसावे. बेलपत्र 3 ते 11 दल या प्रकारे असतात. जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानले जाते. बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाच्या झाडाचे दर्शन मात्र पाप नष्ट करण्यासाठी पुरेसं आहे. शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अपमान करणे योग्य नाही
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)