Shrawan 2022: श्रावणातल्या पहिल्या सोमवारी बनतोय विशेष योग, उपवास करण्यापूर्वी जाणून घ्या नियम

14 जुलै 2022 म्हणजेच गुरुवारपासून हिंदी भाषिक लोकांचा श्रावण महिना (Shrawan 2022) सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात सोमवारचे (Shrawan Somwar vrat) विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान शंकराला जल अर्पण करतात (bhagwan shankar). या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार 18 जुलै रोजी येईल. शिवाला सोमवार तसाही प्रिय असतो, पण श्रावण महिन्याच्या पहिल्या […]

Shrawan 2022: श्रावणातल्या पहिल्या सोमवारी बनतोय विशेष योग, उपवास करण्यापूर्वी जाणून घ्या नियम
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 2:13 PM

14 जुलै 2022 म्हणजेच गुरुवारपासून हिंदी भाषिक लोकांचा श्रावण महिना (Shrawan 2022) सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात सोमवारचे (Shrawan Somwar vrat) विशेष महत्त्व आहे. या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान शंकराला जल अर्पण करतात (bhagwan shankar). या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार 18 जुलै रोजी येईल. शिवाला सोमवार तसाही प्रिय असतो, पण श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारला ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे. या दिवशी  शोभन योग (Shobhan Yog) हा दुर्मिळ योग तयार होत आहे. या शुभ योगात व्रत आणि उपासना केल्याने भगवान शिवाची भक्तांवर विशेष कृपा राहते.

श्रावण सोमवार व्रताच्या तारखा

18 जुलै – पहिला सोमवार उपवास

25 जुलै – दुसरा सोमवारचा उपवास

हे सुद्धा वाचा

01 ऑगस्ट – तिसरा सोमवार उपवास

08 ऑगस्ट – तिसरा सोमवार उपवास

श्रावण  सोमवारची पूजा पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

व्रत करायचे असेल तर व्रताचा संकल्प करून चारही सोमवारी उपवास करा.

पंचोपचार पद्धतीने शंकराची पूजा करावी.

अक्षत, पांढरी फुले, पांढरे चंदन, भांग, धतुरा, गाईचे दूध, धूप, दिवा, पंचामृत, सुपारी, बेलपत्र इत्यादी देवाला अर्पण करा.

भगवान शिवाला दूध किंवा पाण्याने अभिषेक करताना ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा जप करा.

भगवान शिवाचे ध्यान करा आणि शक्य असल्यास शिव चालीसेचे पठण करा.

भगवान शिवाची आरती करा आणि पूजेत समाविष्ट केलेला भोग प्रसादाच्या स्वरूपात इतरांना वाटा.

या लोकांनी करू नये

महादेवावर भक्ती असलेला प्रत्येकाचं जण सोमवारचे व्रत करू शकतो.  परंतु धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत काही विशेष परिस्थितीत करू नये. अशा लोकांना कुठलाच दोष लागत नाही. उदाहरणार्थ, जे लोक आजारी आहेत किंवा उपवास ठेवू शकत नाहीत, त्यांनी सोमवारी उपवास करू नये. आजारी व्यक्तीने उपवास ठेवल्याने शरीरात अशक्तपणा येतो आणि उपवास मोडण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनाही या काळात उपवास टाळावा. तुम्ही पूजा करू शकता पण उपवास करू नका, कारण त्यामुळे पोटातल्या जीवावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय वृद्ध आणि दिव्यांगांनीही उपवास करू नये. अशा लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि अन्न व औषधे वेळेवर घ्यावीत. लक्षात ठेवा, उपवासाचा उद्देश दिवसभर तपश्चर्या आणि देवाचे ध्यान करणे आहे. यामुळे जर कोणाला कसलाही त्रास झाला, मन अस्वस्थ झाले, शरीर साथ देत नसेल तर उपवास करून उपयोग नाही हेही तितकेच खरे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.