Shrawan 2022: श्रावणात कधी आणि कोणती पूजा केल्याने होईल मनोकामना पूर्ण; महादेवाच्या उपासनेची सर्वोत्तम पद्धत आणि विधी

श्रावण महिना (Shrawan 2022) हा देवांचे देव महादेवाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेत जातात. त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना आज 14 जुलै 2022 पासून […]

Shrawan 2022: श्रावणात कधी आणि कोणती पूजा केल्याने होईल मनोकामना पूर्ण; महादेवाच्या उपासनेची सर्वोत्तम पद्धत आणि विधी
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 9:49 AM

श्रावण महिना (Shrawan 2022) हा देवांचे देव महादेवाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेत जातात. त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना आज 14 जुलै 2022 पासून सुरू होणार असून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास (Shrawan puja) करतात. कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. श्रावण महिन्यात, केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल, ते सविस्तर जाणून घेऊया.

श्रवणामध्ये कोणत्या पूजेने महादेव होतील प्रसन्न ?

हे सुद्धा वाचा

भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात, दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करा. श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा, कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करा. ही दोन्ही पानं  नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावीत. श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध, दही, मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराची अर्धीच प्रदक्षिणा करावी.

श्रावण महिन्यात त्यांची शिवाची पूजा करावी

श्रावण महिन्यात देवी सतीने दुस-या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली,  श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केलाच पाहिजे. असे मानले जाते की, भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने, शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नाग देवता यांची देखील अवश्य पूजा करावी.

यंदाचे श्रावण सोमवार कधी येणार?

आठवड्यातील सात दिवसांपैकी सोमवार हा  दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्यास शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. भगवान शंकराला सर्वात प्रिय असलेल्या श्रवण महिन्यात हा सोमवार येतो, तेव्हा या दिवशी उपासनेचे आणि उपवासाचे महत्त्व अधिकच वाढते. जाणून घेऊया सावन महिन्यात सोमवारचा उपवास कधी आणि केव्हा येणार आहेत.

  1. पहिला श्रावण सोमवार व्रत – १८ जुलै २०२२
  2. दुसरा श्रावण सोमवार व्रत – 25 जुलै 2022
  3. तिसरा श्रावण सोमवार व्रत – ०१ ऑगस्ट २०२२
  4. चौथा श्रावण सोमवार व्रत – ०८ ऑगस्ट २०२२
  5. पाचवा श्रावण सोमवार व्रत – १२ ऑगस्ट २०२२

श्रावणात अशा प्रकारे करा महादेवाची पूजा

  1. भगवान शिवाला हिंदू धर्मात भोलेनाथ म्हटले जाते कारण ते श्रद्धेने पूजा केल्यावरच आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. चला जाणून घेऊया श्रावण  महिन्यात महादेवाच्या पूजेशी संबंधित सोपे आणि प्रभावी उपाय
  2. श्रावण महिन्यात धनाच्या इच्छेने शिवाची पूजा करणाऱ्या भक्तांनी संपूर्ण महिनाभर स्फटिकाच्या शिवलिंगाची शुभ्र चंदनाने पूजा करावी. शिवपूजेचा हा उपाय केल्याने महादेवासह माता लक्ष्मीच्या आशिर्वादाचाही वर्षाव होतो.
  3. कोणत्याही विशिष्ट कार्यातील अडथळे दूर करून त्यात अपेक्षित यश मिळवण्यासाठी महादेवाच्या भक्तांनी पारद शिवलिंगाची संपूर्ण श्रावण महिनाभर पूजा करावी.
  4. लग्नानंतर बराच काळ लोटूनही ज्यांना संतानसुख मिळू शकले नाही, त्यांनी श्रावण महिन्यात लोणीचे शिवलिंग बनवून गंगाजलाने अभिषेक करावा. असे मानले जाते की, शिवपूजेशी संबंधित हा उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास इच्छुकांना लवकरच संतानसुख प्राप्त होते.
  5. जर तुम्हाला आजपर्यंत तुमच्या वास्तूचे सुख मिळाले नसेल किंवा तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यात  मधाने शिवलिंगाची विशेष पूजा करावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.