Shrawan 2023 : महादेवाला चुकूनही अर्पण करू नये या गोष्टी, अन्यथा करावा लागू शकतो संकटांचा सामना
शिव उपासना करणाऱ्यांसाठी श्रावण महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या काळात महादेवाची उपासना केल्याने सर्व मनोकामना पुर्ण होतात. महादेवाच्या पुजेत कोणत्या गोष्टी निषिद्ध माणल्या जातात ते जाणून घेऊया.
मुंबई : 18 जुलैपासून श्रावण महिन्याला (Shrawan 2023) सुरूवात होणार आहे. 24 जुलैला पहिला श्रावण सोमवार पाळण्यात येणार आहे. या दिवशी प्रत्येक भक्त आपापल्या परीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना करतो. भगवान शिवाला भोलेनाथ आणि संहारक देखील म्हणतात. नामानुसार ते भक्तांवर लवकरच प्रसन्न होतो आणि क्रोधाचे उग्र रूपही धारण करततात. शिवपुराणात सांगितले आहे की भगवान शिवाची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. शिवपूजेदरम्यान काही गोष्टी अशुभ मानल्या जातात. असे केल्याने भगवान शिव क्रोधित होतात आणि पूजेचे शुभ फळ मिळत नाही. चला जाणून घेऊया या गोष्टींबद्दल..
महादेवाच्या पुजेत या गोष्टी वापरू नये
हळद
अनेक धार्मिक विधी हे हळदीशिवाय पूर्ण होत नाहीत, परंतु भगवान शंकराच्या पूजेमध्ये हळदीचा वापर केला जात नाही. सौंदर्यप्रसाधनांमध्ये हळदीचा वापर केला जातो. शास्त्रात सांगितले आहे की हळद ही स्त्रियांशी संबंधित वस्तू आहे आणि शिवलिंग हे पुरुष तत्व मानले जाते. या कारणास्तव भगवान शंकराच्या पूजेमध्ये हळदीचा वापर करू नये.
तुळशीची पाने
तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते आणि तुळशीचा उपयोग सर्व दैवी कार्यात शुद्धतेसाठी केला जातो परंतु भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जात नाही. खरंतर त्यामागे एक पौराणिक कथा आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने तुळशीचा पती असुर जालंधरचा वध केला होता, ज्यामुळे तुळशीने स्वतः भगवान शिवाची पूजा करण्यास नकार दिला होता.
शंख किंवा शंखाने जलाभिषेक करू नये
भगवान शंकराच्या पूजेत शंखाचा वापर केला जात नाही. यामागे एक आख्यायिका आहे. पौराणिक कथेनुसार शंखचूड हा राक्षस सर्व देवी-देवतांना त्रास देत होता. त्यानंतर भगवान शिवाने त्रिशूलाने त्याचा वध केला, त्यामुळे त्याचे शरीर भस्म झाले आणि त्या राखेपासून शंखाचा जन्म झाला. भगवान शंकराने शंखचूड या राक्षसाचा वध केल्यामुळे त्यांच्या पूजेत शंख वापरला जात नाही.
नारळ किंवा नारळ पाणी
शिवाच्या पूजेत उसाचा रस, दूध, मध, दही वगैरे अर्पण केले जाते पण नारळ किंवा नारळपाणी अर्पण केले जात नाही. देवतांना अर्पण केलेल्या वस्तू स्वतः स्वीकारणे आवश्यक आहे, परंतु शिवलिंगाला अर्पण केलेल्या वस्तू स्वीकारण्यास मनाई आहे, म्हणून शिवलिंगाला नारळाच्या पाण्याने अभिषेक केला जात नाही.
केतकी, केवडा आणि लाल रंगाची फुले
शिवलिंगावर केतकी, कणेर किंवा लाल रंगाची कमळ वगैरे फुले अर्पण करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे. या फुलांशिवाय इतरही फुले शिवलिंगावर अर्पण करता येतात. बेलपत्र, भांग, धतुरा, जलाभिषेक इत्यादी गोष्टींनीच महादेव प्रसन्न होतात, म्हणूनच शिवलिंगाच्या पूजेमध्ये अशा प्रकारची फुले वापरण्यास मनाई आहे.
कुमकुम, सिंदूर आणि रोळी
कुमकुम, सिंदूर आणि रोळीने इतर देवतांची पूजा करता येते, परंतु महादेवाच्या पूजेत त्यांचा वापर निषिद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. हळदीप्रमाणेच यामध्येही स्त्रीलिंगी घटक असतात, त्यामुळे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतात, परंतु या वस्तूंनी शिवलिंगाची पूजा करू नये. शिवलिंगाच्या पूजेमध्ये चंदन किंवा भस्माचा वापर करू शकता. त्याचबरोबर शिवलिंगाला पितळ, अष्टधातू किंवा पितळेच्या भांड्याने जलाभिषेक करावा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)