Shrawan 2023: कधी सुरू होणार 2023 चा श्रावण महिना, यंदा किती श्रावण सोमवार असणार?
श्रावणामध्ये महादेवाचा जलाभिषेक, दुधाभिषेक केला जातो. 2023 मध्ये श्रावण महिना केव्हा सुरू होत आहे हे जाणून घेऊया.

मुंबई, हिंदू धर्मात, प्रत्येक महिना कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केला जातो. श्रावण (Shrawan 2023) महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. या महिन्यात महादेवाची आराधना, उपवास, उपाय इत्यादी केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. या वर्षी 2023 मध्ये श्रावण महिना एक नव्हे तर दोन महिन्यांचा असेल. म्हणजेच यावेळी तुम्हाला 60 दिवस भगवान शंकराची पूजा करण्याची संधी मिळणार आहे. शास्त्रानुसार श्रावण महिना हा वर्षातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. याच महिन्यात कावड यात्राही सुरू होते. श्रावणामध्ये महादेवाचा जलाभिषेक, दुधाभिषेक केला जातो. 2023 मध्ये श्रावण महिना केव्हा सुरू होत आहे हे जाणून घेऊया.
श्रावण 2023 कधी सुरू होईल?




श्रावण महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. सावनमध्ये सोमवारचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यात सोमवारी उपवास केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात. या दरम्यान अनेक जण श्रावणापासून सुरू होणारे सोळा सोमवार उपवास करतात. यंदा अधिक मास असल्याने श्रावण महिना दोन महिन्यांचा राहणार आहे. म्हणूनच या वर्षी श्रावण 4 जुलैपासून सुरू होत असून तो 31 ऑगस्टला संपणार आहे.
श्रावण सोमवारच्या तारखा
यंदा 4 ऐवजी 8 श्रावण सोमवार असतील.
- पहिला सोमवार: 10 जुलै
- दुसरा सोमवार: 17 जुलै
- तिसरा सोमवार: 24 जुलै
- चौथा सोमवार: 31 जुलै
- पाचवा सोमवार: 07 ऑगस्ट
- सहावा सोमवार: 14 ऑगस्ट
- सातवा सोमवार: 21 ऑगस्ट
- आठवा सोमवार: 28 ऑगस्ट
श्रावण सोमवारचे महत्त्व
धार्मिक ग्रंथानुसार श्रावण महिना भोलेनाथला समर्पित आहे. या संपूर्ण महिन्यात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपासनेसह उपवास करतात. यावेळी त्यांना पाण्यासोबत बेलपत्र, धतुरा, शमीची पाने इत्यादी अर्पण केले जातात. तसेच या महिन्यात अविवाहित स्त्रिया इच्छित वर मिळविण्यासाठी सोमवारी उपवास करतात.