Shrawan Somwar 2022: आज श्रावणातला पहिला सोमवार, काशीमध्ये पाच लाख भाविक करणार श्री विश्वनाथाचा अभिषेक
काशी विश्वनाथ (Kashi vishwanath) धामच्या निर्मितीनंतर हा श्रावणाचा पहिला (Shrawan 2022) महिना आहे. हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्याला 14 जुलै पासून प्रारंभ झाला. उद्या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे (Frist shrawan somwar). बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरात यावेळी भाविकांना श्रावण महिन्यात विशेष सुविधा मिळणार आहेत. यावेळी सावन महिन्याच्या पहिल्या सोमवारी 5 लाख भाविक येण्याची […]

काशी विश्वनाथ (Kashi vishwanath) धामच्या निर्मितीनंतर हा श्रावणाचा पहिला (Shrawan 2022) महिना आहे. हिंदी भाषिकांच्या श्रावण महिन्याला 14 जुलै पासून प्रारंभ झाला. उद्या श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे (Frist shrawan somwar). बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरात यावेळी भाविकांना श्रावण महिन्यात विशेष सुविधा मिळणार आहेत. यावेळी सावन महिन्याच्या पहिल्या सोमवारी 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. विश्वनाथ धामच्या उद्घाटनानंतर आणि कोरोनाच्या निर्बंधातून मुक्तीनंतर प्रथमच भाविकांना नव्याने बांधलेल्या गंगाद्वारातून थेट गंगाजल घेऊन जलाभिषेक करण्यासाठी बाबा विश्वनाथांच्या दरबारात जाता येणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कावड यात्राही बंद होती, त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने भाविक कशी विश्वनाथाच्या दर्शनाला येण्याची शक्यता लक्षात घेता मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिरात सहज प्रवेश मिळावा यासाठी सर्व रस्त्यांवर सुलभ व्यवस्था करण्यात आली आहे. इतकेच नाही तर भाविकांसाठी मोठे पेंडॉल, रेड कार्पेट, पिण्याचे पाणी, एलईडीवर थेट दर्शन, दिव्यांग आणि अपंगांसाठी ई-रिक्षा, विविध भाषांमधील सूचना उपलब्ध असतील. काशी विश्वनाथ मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वर्मा यांनी श्रवणाचा तयारीची माहिती दिली.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कावड यात्राही बंद होती, त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येतात. यामध्ये अनेक भाविक दिव्यांगसुद्धा असतात, त्यामुळे मैदगीन ते गोडोलिया या मार्गावर दिव्यांग भाविकांसाठीही ई-रिक्षाची व्यवस्था करण्यात येणार आहे. गतवर्षीपेक्षा यंदा भाविकांना अधिक सुविधा मिळणार आहेत.
रेड कार्पेट, वैद्यकीय सुविधा आणि पारंपारिक टीव्ही व्यतिरिक्त, 12 मोठे एलईडी टीव्ही देखील लावण्यात आले आहेत. ज्यावर भाविकांना बाबा विश्वनाथांचे थेट दर्शन घेता येणार आहे. दर्शन आणि आरतीसाठी यंदा तिकिटाचे दर वाढविण्यात आलेले आहेत. 10 ते 15 रुपयांनी तिकिटाचे दर वाढविले असून या बदल्यात भाविकांना सुविधाही देणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
मंदिरात प्रवेश आणि निर्गमनासाठी जुना मार्गही खुला असेल. यासोबतच नवीन मार्गाने गंगाद्वारातून थेट गंगाजल घेऊनही भाविकांना मंदिरात येता येणार आहे. विश्वनाथ धामचे उद्घाटन आणि कावड यात्रेच्या प्रारंभामुळे बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी 3 ते 5 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. सहसा इतर दिवशी एक ते दीड लाख भाविक दर्शनासाठी येतात.