Shrawan Somwar : उद्या श्रावणातला दुसरा सोमवार, अशाप्रकारे महादेवाला अभिषेक केल्याने दूर होतील सर्व समस्या

Shrawan Somwar अनेक जण श्रावण सोमवारी उपवास देखील करतात. श्रावण महिन्यात, केलेल्या शिवभक्तीमुळे भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

Shrawan Somwar : उद्या श्रावणातला दुसरा सोमवार, अशाप्रकारे महादेवाला अभिषेक केल्याने दूर होतील सर्व समस्या
महादेव अभिषेकImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 1:20 PM

मुंबई : श्रावणाचा दूसरा सोमवार (Shrawan Somwar) उद्या म्हणजेच 28 ऑगस्टला आहे. हा सोमवार विवीध अर्थाने विशेष असणार आहे. श्रावण सोमवारी शिवभक्त भोलेनाथाची वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात. अनेक जण श्रावण सोमवारी उपवास देखील करतात. श्रावण महिन्यात, केलेल्या शिवभक्तीमुळे भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की, श्रावण सोमवारी विशेष प्रकारे शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनात प्रगती आणि समृद्धी प्राप्त होते. यासोबतच भगवान शिव आणि माता पार्वतीची कृपाही कायम राहते. चला जाणून घेऊया श्रावण सोमवारचे वेगवेगळे उपाय.

या उपायाने होते प्रगती

जर तुम्हाला तुमच्या नोकरी-व्यवसायाची चिंता वाटत असेल आणि तुमच्या मेहनतीनुसार चांगली प्रगती होत नसेल तर श्रावणाच्या सोमवारी उपवास करा आणि पाण्यात मध मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा. तसेच शिवलिंगावर डाळिंबाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने करिअरमध्ये प्रगतीची शक्यता निर्माण होते आणि नोकरी-व्यवसायातील सर्व चिंता दूर होतात.

या उपायाने होते संपत्तीत वाढ

धन-संपत्ती आणि सुख-संपत्ती वाढवण्यासाठी श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत ठेवावे आणि प्रदोष काळात शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करावा. यासोबतच बेलपत्र, धतुरा इत्यादी वस्तू भगवान शिवाला अर्पण करा. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सुख-शांतीसोबतच संपत्तीतही वाढ होते.

हे सुद्धा वाचा

या उपायाने अडकलेले धन मिळते

अडकलेले पैसे मिळवण्यासाठी  श्रावण सोवमारी गाईला किंवा बैलाला हिरवा चारा खायला द्या. बैलाची पूजा भगवान भोलेनाथांचे वाहन नंदी म्हणून केली जाते. सावन महिन्यात बैलाला हिरवा चारा खायला दिल्यास अडकलेला पैसा लवकर येतो आणि धन वाढण्याचे शुभ योग सुरू होतात.

या उपायाने धन आणि धान्य वाढते

धन-धान्य वाढवण्यासाठी प्रदोष काळात श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा आणि शिव चालिसाचा पाठ करावा. यानंतर ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा 108 वेळा जप करा. शिवपुराणात सांगितले आहे की असे केल्याने धन-धान्य वाढते आणि लक्ष्मीचे आगमन होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.