Shrawan Upay : कर्जामुळे जीवनात तणाव आहे का? श्रावणात अवश्य करा हे प्रभावी उपाय
श्रावण महिन्यात काही उपाय (Shrawan Upay) केले तर धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. आता जाणून घ्या असे कोणते उपाय आहेत.
मुंबई : श्रावण महिना भगवान शिवाचा आवडता महिना आहे. या महिन्यात भगवान शिवाची उपासना केल्याने जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. दरिद्री योग देखील विशेष प्रयोगाने नष्ट होऊ शकतो. आर्थिक समस्यांशी झुंजणारे अनेक जण आहेत. जर अशा लोकांनी श्रावण महिन्यात काही उपाय (Shrawan Upay) केले तर धनाशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. आता जाणून घ्या असे कोणते उपाय आहेत. ज्यामुळे कर्जासारख्या आर्थिक चक्रव्युहातून मुक्ती मिळू शकते.
अशा प्रकारे मजबूत होईल आर्थिक स्थिती
श्रावण सोमवारी संध्याकाळी मंदिरात जाऊन शंकराला जल अर्पण करा. यानंतर तेथे बसून शिवाच्या पंचाक्षर मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. मंत्र आहे- नमः शिवाय. त्यानंतर माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा. मंत्र आहे- ‘ओम श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं श्रीं श्रीं महालक्ष्मायै नमः’. संध्याकाळी भगवान शंकराची आरती करावी आणि नंतर मता लक्ष्मीची आरती करावी. त्यानंतर महादेव आणि माता लक्ष्मीला धनप्राप्तीसाठी प्रार्थना करा.
पैशाच्या स्थितीतील चढउतार दूर होतील
श्रावणात संध्याकाळी महादेवाला पाणी आणि बेलपत्र अर्पण करा. महादेवाला पांढरे मिष्ठान्न अर्पण करा आणि माता लक्ष्मीला खीर अर्पण करा. प्रथम शिवपंचाक्षर स्तोत्राचा पाठ करा. त्यानंतर माता लक्ष्मीच्या विशेष मंत्राचा जप करा. मंत्र आहे- ‘महालक्ष्म्यै च विदमहे विष्णुपत्न्यीच धिमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्’. त्यानंतर नैवेद्याचा प्रसाद वाटावा. श्रावणाच्या शुक्रवारी घराच्या मुख्य दारावर मनी प्लांट लावणे देखील फायदेशीर ठरेल.
आर्थिक संकट टाळण्यासाठी हे उपाय करा
श्रावणात शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर पांढर्या चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर महादेवाला दुध मोगऱ्याचे फूल आणि माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. यानंतर “दरिद्रय दहन स्तोत्र” पाठ करा. यानंतर माता लक्ष्मीच्या ‘ओम महालक्ष्मी नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करा. दररोज रात्री भगवान शंकरासमोर तुपाचा दिवा लावावा. दिवा लावल्यानंतरही स्तोत्र पठण करा आणि बोटात तांब्याची अंगठी घाला.
कर्जातून सुटका होण्यासाठी
श्रावणात रोज शिवलिंगाला पांढरे फुलं अर्पण करा. यानंतर ‘ ओम नमः शिवाय’ म्हणत शिवलिंगाला जल अर्पण करावे. त्यानंतर माता लक्ष्मीला लाल गुलाबाचे फूल अर्पण करा आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. यानंतर ऋणमुक्तीसाठी दोन्ही देवतांची प्रार्थना करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)