Shrawan Somawar: भीमाशंकर मंदिरात भाविकांची गर्दी, आज श्रावणातला शेवटचा सोमवार
शेवटचा चौथा श्रावणी सोमवार असल्याने हर हर महादेव, बम्ब बम्ब भोले, ॐ नम:शिवाय म्हणत भाविकांनी या परिसरात पहाटेपासुनच रांगा लावत दर्शन घेत आहे. गेली दोन वर्ष कोरोना काळात निर्बंधामुळे मंदिर आणि उत्सवावर बंदी होती.
पुणे, आज श्रावण मासातील चौथा आणि शेवटचा सोमवार (last shrawan somwar) असल्याने पुणे जिल्ह्यातील बारा जोतिर्लिंगापैकी (12 jotirling) एक असलेल्या भिमाशंकरला (Bhimashankar) कालपासुनच भाविकांनी गर्दी करत लांबच लांब रांगा लावल्या , भाविकांची गर्दी झाली असून पहाटेची महापूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले, शेवटचा चौथा श्रावणी सोमवार असल्याने हर हर महादेव, बम्ब बम्ब भोले, ॐ नम:शिवाय म्हणत भाविकांनी या परिसरात पहाटेपासुनच रांगा लावत दर्शन घेत आहे. गेली दोन वर्ष कोरोना काळात निर्बंधामुळे मंदिर आणि उत्सवावर बंदी होती. यंदा सर्वच सण आणि उत्सव निर्बंधमुक्त साजरे होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातवरण आहे.
आज शेवटचा सोमवार
आज श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे. अनेक जण शेवटच्या सोमवारी उपवास करतात. महादेवाला अभिषेक करण्यासाठी श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्याने अनेक भाविक पुण्याच्या भीमाशंकर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहे. बारा जोतिर्लिंगापैकी एक असल्याने या मंदिरात श्रावण महिन्यात भक्तांची रीघ असते.
28 ऑगस्टपासून सुरु होतोय भाद्रपद महिना
आज श्रावण महिन्याचा चौथा आणि शेवटचा सोमवार महादेवाचा लाडका श्रावण महिना आता संपत आला आहे. 27 ऑगस्टला श्रावण महिना संपेल आणि भाद्रपद महिना सुरू होईल. भोलेनाथाच्या भक्तीसाठी श्रावण सोमवार हा अतिशय उत्तम मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी व्रत ठेऊन खऱ्या मनाने रुद्राभिषेक केल्यास सर्व सुख प्राप्त होते. रुद्राभिषेक म्हणजे भगवान रुद्राचा अभिषेक, म्हणजेच मंत्राने शिवलिंगाचा अभिषेक. श्रावणमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक करता येत नसेल, तर श्रावणच्या शेवटच्या सोमवारी रुद्राभिषेक करून भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्याची संधी आहे. सोमवारी शिवाचा रुद्राभिषेक केल्याने सर्व रोग नष्ट होतात आणि ग्रह दोषांपासून मुक्ती मिळते, असे सांगितले जाते.
आजची शिवमूठ
आजची शिवमूठ जव आहे. यंदा श्रावण महिन्यात चार श्रावण सोमवार आले आहेत. पहिल्या सोमवारी तांदूळ हे शिवमूठ होते. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या व शेवटच्या सोमवारी जव ही शिवमूठ आहे. महादेवाची पूजा करीत असताना पूजेच्या वेळी शिवमूठ अर्पण केल्याने विशेष फळ मिळते. शिवमूठ अर्पण करून महादेवाला 108 बेलपत्र वाहावे व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.