Shri Krishna Janmashtami 2023 : कधी साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी? दूर करा तारखेचा संभ्रम

Shri Krishna Janmashtami 2023 : साधारणपणे जन्माष्टमीला बालकृष्णाची स्थापना केली जाते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवी ती मुर्ती स्थापित करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती स्थापित करू शकता.

Shri Krishna Janmashtami 2023 : कधी साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी? दूर करा तारखेचा संभ्रम
कृष्ण जन्माष्टमीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 05, 2023 | 6:11 PM

मुंबई : भगवान श्रीकृष्णांचा (Shri Krushna Janmashtami) जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला. या दिवशी त्यांचा जन्मदिवस जगभरात साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात जन्माला आले. त्यामुळे जन्माष्टमी साजरी करताना रोहिणी नक्षत्रही ध्यानात ठेवले जाते. यंदा जन्माष्टमीच्या तारखेबाबत मोठा गोंधळ आहे. कोणी जन्माष्टमीचा सण 6 सप्टेंबर तर कोणी 7 सप्टेंबरला सांगत आहेत. जन्माष्टमीची नेमकी तारीख कोणती आहे ते जाणून घेऊया.

कधी साजरी होणार जन्माष्टमी?

यावेळी भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी 06 सप्टेंबर रोजी दुपारी 03.38 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी दुपारी 04.14 वाजता समाप्त होईल. या काळात संपूर्ण रात्रभर रोहिणी नक्षत्र राहील. ज्योतिषांच्या मते, यावर्षी गृहस्थ 6 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी करतील. तर वैष्णव संप्रदायातील लोकं 7 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत.

शुभ मुहूर्त

ज्योतिषांचे म्हणणे आहे की, यावर्षी घरगुती जीवनातील लोक 6 सप्टेंबर रोजी जन्माष्टमी उत्सव साजरा करतील. जन्माष्टमीच्या पूजेसाठी 6 सप्टेंबर रोजी रात्री 11.56 ते 12.42 पर्यंत सर्वोत्तम शुभ मुहूर्त असेल.

हे सुद्धा वाचा

जन्माष्टमीला श्रीकृष्णाची कोणती मूर्ती आणावी?

साधारणपणे जन्माष्टमीला बालकृष्णाची स्थापना केली जाते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हवी ती मुर्ती स्थापित करू शकता. प्रेम आणि वैवाहिक जीवनासाठी तुम्ही राधाकृष्णाची मूर्ती स्थापित करू शकता. तुम्ही तुमच्या मुलांसाठी बाल कृष्णाची मूर्ती बसवू शकता. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही कामधेनू गायीसोबत बसलेल्या श्रीकृष्णाची मूर्ती बसवू शकता.

श्रीकृष्णाला सजवायचे कसे?

जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या श्रृंगारात भरपूर फुलांचा वापर करा. देवाला पिवळे वस्त्र आणि चंदनाच्या सुगंधाने सजवा. यामध्ये काळा रंग अजिबात वापरू नका. श्रीकृष्णाला कर्दळीचे फुले अर्पण केल्यास उत्तम.

श्रीकृष्णाला कशाचा नैवेद्य दाखवावा

जन्माष्टमीला श्रीकृष्णाला पंचामृत अवश्य अर्पण करा. त्यामध्ये तुळशीची पानेही अवश्य टाका. सुका मेवा, लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवा.

जन्माष्टमी कशी साजरी करावी?

जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास व पूजेचा संकल्प घ्यावा. दिवसभर पाणी किंवा फळांचे सेवन करा. मध्यरात्री कृष्णाची धातूची मूर्ती भांड्यात ठेवावी. पंचामृताने स्नान करा. यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करावे. षोडशोपचार पूजा करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.