Shukra Pradosh : आज शुक्र प्रदोष व्रत, पूजा विधी आणि महत्त्व, अखंड सौभाग्यासाठी अशा प्रकारे करा हे व्रत

शुक्रवारी येणारे प्रदोष व्रत शुक्र प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी शिव-पार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

Shukra Pradosh : आज शुक्र प्रदोष व्रत, पूजा विधी आणि महत्त्व, अखंड सौभाग्यासाठी अशा प्रकारे करा हे व्रत
प्रदोष व्रतImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 10:03 AM

मुंबई : आज शुक्र प्रदोष व्रत (Shukra Pradosh Vrat) आहे.  शुक्रवारी येणारे प्रदोष व्रत शुक्र प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी शिव-पार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.  या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतात अशी धार्मिक मान्यता आहे. प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत दर महिन्याला त्रयोदशी तिथीला पाळले जाते. अश्विन महिन्यातील प्रदोष व्रत आज म्हणजेच 14 जुलै 2023 ला आहे. शुक्रवारी पडल्यामुळे याला शुक्र प्रदोष व्रत म्हणतात. शुक्र प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे. शुक्र प्रदोष व्रत ठेवल्याने सुख-समृद्धी मिळते.  शुक्र प्रदोष व्रताची शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.

शुक्र प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

आषाढ कृष्ण पक्षाची त्रयोदशी तारीख 14 जुलै 2023 आषाढ त्रयोदशी तिथी सुरू होते – 14 जुलै, संध्याकाळी 07:17 पासून आषाढ कृष्ण त्रयोदशी तिथी समाप्त – 15 जुलै, रात्री 08:32 वाजता

प्रदोष व्रत पूजा विधि

शुक्र प्रदोष व्रत करण्यासाठी त्रयोदशीला सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ, हलके पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिधान करून शुक्र प्रदोष व्रत करावे. त्यानंतर बेलपत्र, अक्षत, दीप, धूप, गंगाजल इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करावी.

हे सुद्धा वाचा

अनेक जण हा उपवास कडक करतात पण तब्येतीची काळजी घेऊनच उपवास करावा. संध्याकाळी प्रदोषकाळात ईशान्य दिशेला तोंड करून आसनावर स्थानापन्न व्हावे. त्यानंतर महादेवाला पाण्याने अभिषेक करून रोळी, मोळी, तांदूळ, धूप, दिवा लावून पूजा करावी. भगवान शंकराला तांदळाची खीर आणि फळे अर्पण करा व ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा.

शुक्र प्रदोष व्रताचे महत्त्व

प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष कालचा काळ शुभ मानला जातो. या काळात केलेल्या सर्व प्रार्थना आणि उपासना यशस्वी मानल्या जातात. हे व्रत केल्याने रोग, ग्रह दोष, दुःख, पाप इत्यादीपासून मुक्ती मिळते. याशिवाय या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे निपुत्रिकांना संतती प्राप्त होते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.