Shukra Pradosh Vrat: आज शुक्र प्रदोष व्रत, मनोकामना पूर्ण करण्यासाठी अशी करा महादेवाची पूजा

शुक्र प्रदोष व्रत हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी व्रत मानले जाते. हे व्रत कसे करावे याबद्दल जाणून घेऊया.

Shukra Pradosh Vrat: आज शुक्र प्रदोष व्रत, मनोकामना पूर्ण करण्यासाठी अशी करा महादेवाची पूजा
प्रदोष व्रत Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 07, 2022 | 1:00 PM

मुंबई,  आज शुक्र प्रदोष व्रत (Shukra Pradosh Vrat) आहे.  शुक्रवारी येणारे प्रदोष व्रत शुक्र प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाते. हिंदू धर्मात प्रदोष व्रताला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी शिव-पार्वतीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.  या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतात अशी धार्मिक मान्यता आहे. प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित आहे. प्रदोष व्रत दर महिन्याला त्रयोदशी तिथीला पाळले जाते. अश्विन महिन्यातील प्रदोष व्रत आज म्हणजेच 7 ऑक्टोबर 2022 ला आहे. शुक्रवारी पडल्यामुळे याला शुक्र प्रदोष व्रत म्हणतात. शुक्र प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे. शुक्र प्रदोष व्रत ठेवल्याने सुख-समृद्धी मिळते.  शुक्र प्रदोष व्रताची शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.

शुक्र प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

  1. अश्विन, शुक्ल त्रयोदशी
  2. अश्विन शुक्ल त्रयोदशी तिथी सुरू होते – 07 सप्टेंबर, सकाळी 07:26 पासून
  3. अश्विन शुक्ल त्रयोदशी तिथी समाप्त – 08 सप्टेंबर, सकाळी 05:24 वाजता

प्रदोष व्रत पूजा विधि (शुक्र प्रदोष व्रत पूजन विधि)

शुक्र प्रदोष व्रत करण्यासाठी त्रयोदशीला सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ, हलके पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिधान करून शुक्र प्रदोष व्रत करावे. त्यानंतर बेलपत्र, अक्षत, दीप, धूप, गंगाजल इत्यादींनी भगवान शंकराची पूजा करावी.

अनेक जण हा उपवास कडक करतात पण तब्येतीची काळजी घेऊनच उपवास करावा. संध्याकाळी प्रदोषकाळात ईशान्य दिशेला तोंड करून आसनावर स्थानापन्न व्हावे. त्यानंतर महादेवाला पाण्याने अभिषेक करून रोळी, मोळी, तांदूळ, धूप, दिवा लावून पूजा करावी. भगवान शंकराला तांदळाची खीर आणि फळे अर्पण करा व ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा.

हे सुद्धा वाचा

शुक्र प्रदोष व्रताचे महत्त्व

प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष कालचा काळ शुभ मानला जातो. या काळात केलेल्या सर्व प्रार्थना आणि उपासना यशस्वी मानल्या जातात. हे व्रत केल्याने रोग, ग्रह दोष, दुःख, पाप इत्यादीपासून मुक्ती मिळते. याशिवाय या व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे निपुत्रिकांना संतती प्राप्त होते. (वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.