Shukrawar Upay : शुक्रवारी चुकूनही करू नये पैशांशी संबंधीत या चुका, लक्ष्मीचा होतो अनादर
ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत, जे केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या उपायांबद्दल जाणून घ्या.
मुंबई : शुक्रवारी संपूर्ण विधीपूर्वक माता लक्ष्मीची पूजा (Lakshmi Puja) केली जाते. शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी केलेल्या पूजेने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते. ज्योतिष शास्त्रामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत, जे केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या उपायांबद्दल (Shukrawar Upay) जाणून घ्या.
लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे उपाय
- देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात स्वच्छता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्या. माता लक्ष्मी नाराज होऊन कोणत्याही अपवित्र किंवा अस्वच्छ जागेवरून निघून जाते. रात्रीच्या वेळी देखील स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवू नका.
- घाण हातांनी पैशाला कधीही स्पर्श करू नका. हाताने पैसे मोजताना नोटेवर कधीही थूंकी वापरू नका. यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि ती गलबलून निघून जाते.
- माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी घराच्या मुख्य दारावर, बाहेरील जमिनीवर, माता लक्ष्मीच्या पाउलांची रांगोळी काढा. यामुळे लक्ष्मी घरात प्रवेश करते.
- माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी सकाळी स्नान आणि ध्यान केल्यानंतर पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे घाला. शुक्रवारी या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते.
- माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ईशान्य किंवा पूर्व दिशेला ठेवूनच पूजा करा. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिला कमळाचे फूल अर्पण करा आणि श्रीसूक्ताचे पठण करा.
- स्फटिक किंवा कमळाच्या माळाने माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा. लक्ष्मीसह भगवान श्री नारायणाची पूजा करा. लक्ष्मी आणि नारायण या दोघांची पूजा केल्याने सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद कायम राहतो आणि पैशाशी संबंधित अडथळे दूर होतात.
- आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी महालक्ष्मी यंत्राची स्थापना करून पूजा करावी. महालक्ष्मी यंत्र तिजोरीत ठेवल्याने धन मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)