Shukrawar Upay: शुक्रवारच्या दिवशी केलेल्या ‘या’ उपायांमुळे आर्थिक समस्या होतात दूर, लक्ष्मीची राहते कृपा
तुम्ही जर आर्थिक समस्येने ग्रस्त असाल तर शुक्रवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया या उपायांबद्दल.
मुंबई, हिंदू धर्मानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा केली जाते. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन धान्य आणि समृद्धी टिकून राहते. लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यवसाय आणि नोकरीत बरकत राहते. कष्टाचे योग्य फळ मिळते. शुक्रवारच्या (Shukrawar Upay) दिवशी केलेल्या काही उपायांमुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. विशेषतः आर्थिक समस्येने ग्रस्त असणाऱ्यांनी हे उपाय केल्यास कठीण परिस्थितीतून मार्ग निघतो.
- जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर शुक्रवारी रात्री ‘ऐन ह्रीं श्री अष्टलक्ष्मीये ह्रीं सिद्धये मम गृहे अगच्छगश्च नमः स्वाहा’ या मंत्राचा 108 वेळा जप करा. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
- लक्ष्मीला पांढरे मिष्ठान्न प्रिय आहे, दर शुक्रवारी पांढऱ्या मिष्ठान्नाचा नैवैद्य दाखविल्यास लक्ष्मी प्रसन्न राहते.
- दर शुक्रवारी देवीच्या मंदिरात लाल रंगाची फुले अर्पण करावीत. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि धनप्राप्ती होते.
- ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी रात्री गुलाबी रंगाचे वस्त्र घेऊन त्यावर श्रीयंत्र आणि अष्टलक्ष्मीचे चित्र स्थापित करा. यामुळे तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल.
- लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर भगवान विष्णूचीही पूजा करावी. शुक्रवारी रात्री दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान विष्णूचा अभिषेक करावा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतील आणि फायदा होईल.
- अष्टगंधासह श्रीयंत्र आणि अष्टलक्ष्मीला तिलक लावा. असे मानले जाते की यामुळे तुमच्या जीवनात आनंद येईल आणि जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)