‘या’ गोष्टी सोबत घेऊन झोपणे असते अत्यंत शुभ, मिळतात अनेक लाभ

आपल्या धर्मग्रंथात जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यांचे पालन केल्यास जीवनात सुख-शांती कायम राहते.

'या' गोष्टी सोबत घेऊन झोपणे असते अत्यंत शुभ, मिळतात अनेक लाभ
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 10:33 AM

मुंबई, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी हवी असते. जेव्हा माणसाच्या जीवनात सुख-शांती असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात नेहमी सकारात्मकता असते. आपल्या धर्मग्रंथात जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यांचे पालन केल्यास जीवनात सुख-शांती कायम राहते. वास्तुमध्ये (Vastu Tips) रात्री झोपताना काही नियम बनवले आहेत, ज्याचे पालन केल्यास प्रत्येक व्यक्तीला नक्कीच फायदा होतो.

झोपताना या गोष्टी सोबत घेऊन झोपा

  • रात्री चांगली झोप आणि चांगले विचार यासाठी रात्री झोपताना डोक्यावर पवित्र धार्मिक ग्रंथ ठेवा. या उपायाने जीवनात आनंद मिळतो. त्याच वेळी, वाईट स्वप्ने रात्री कमी येतात. झोपताना भगवद्गीता डोक्यावर ठेवा.
  • जीवनात सकारात्मकता आणि शांततेसाठी, झोपताना आपल्या बेडजवळ सुगंधी फुले ठेवा. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
  • जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल किंवा तुम्हाला जास्त वाईट स्वप्न पडत असतील तर तुमच्या पलंगाच्या जवळ एक लोखंडी वस्तू नक्कीच ठेवा. हा उपाय तुमच्या सभोवतालच्या नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी करतो.
  • रात्री झोपताना चांगल्या झोपेसाठी विलायची कपड्यात बांधून पलंगाखाली ठेवल्यास ग्रहांशी संबंधित दोष दूर होतात. या उपायाने मन नेहमी प्रसन्न राहते.
हे सुद्धा वाचा

कोणत्या दिशेला झोपल्याने काय परिणाम होतो

  1. पूर्व दिशेने स्मरणशक्ती वाढते: देवांचा राजा इंद्र याला पूर्वेचा स्वामी म्हटले गेले आहे. सकाळी उठल्याबरोबर ही दिशा पाहणे म्हणजे तुमच्या समृद्धीसाठी देवेंद्रकडून आशीर्वाद घेण्यासारखे आहे.या दिशेला डोके ठेवून झोपल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि आरोग्य सुधारते आणि अध्यात्माकडे कल वाढतो.त्यानुसार याचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी पूर्व दिशेला डोके ठेवून झोपावे.
  2. पश्चिम दिशा अनुकूल आहे : वरुण, पाण्याचे प्रमुख देवता, हे पश्चिमेचे स्वामी असल्याचे म्हटले जाते, जो आपल्या आत्मा, आध्यात्मिक भावना आणि विचारांवर प्रभाव टाकतो. वास्तूनुसार पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपणे देखील अनुकूल असते कारण या दिशेने नाव, कीर्ती, प्रतिष्ठा आणि समृद्धी वाढते.
  3. दक्षिण सर्वोत्तम आहे : मृत्यूची देवता यम दक्षिण दिशेचा स्वामी आहे, या दिशेला डोके ठेवून झोपणे उत्तम. वास्तूमध्ये असे म्हटले आहे की ‘ज्या माणसाला निरोगी जीवन हवे आहे त्याने नेहमी दक्षिणेकडे डोके आणि उत्तरेकडे पाय ठेवून झोपावे’. या दिशेकडे डोके ठेवून झोपल्यास व्यक्तीला धन, सुख, समृद्धी आणि कीर्ती प्राप्त होते. याशिवाय गाढ झोपेत व्यक्ती आरामात झोपते.
  4. उत्तरेकडे कधीही झोपू नका : कुबेर, संपत्तीचा प्रमुख देवता, उत्तर दिशेचा स्वामी आहे. वास्तूनुसार या दिशेला डोके ठेवून झोपल्याने झोपेचा त्रास होतो, त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.जे लोक डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे ठेवून झोपतात, असे लोक रात्रभर बाजू बदलत राहतील, उठल्यानंतरही आळस कायम राहील. सकाळी मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे वास्तूवर विश्वास असेल तर या दिशेला डोके ठेवून कधीही झोपू नका.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.