Solar Eclipse 2021 | जाणून घ्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी होईल, ते कुठे दिसेल

| Updated on: Nov 23, 2021 | 2:58 PM

चंद्रग्रहणानंतर बरोबर १५ दिवसांनी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहणही होणार आहे. जाणून घ्या हे सूर्यग्रहण कोणत्या वेळी होणार आहे आणि ते कुठे दिसेल.

Solar Eclipse 2021 | जाणून घ्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी होईल, ते कुठे दिसेल
solar eclipse 2021
Follow us on

मुंबई : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण संपल्यानंतर आता शेवटचे सूर्यग्रहण (सूर्यग्रहण 2021) होणार आहे. हे ग्रहण शनिवार, ४ डिसेंबर रोजी होणार आहे. कोणतेही ग्रहण ही खगोलीय घटना मानली जात असली, तरी धार्मिक दृष्टीकोनातून हे ग्रहण शुभ मानले जात नाही कारण या काळात सूर्य किंवा चंद्र राहूने ग्रासलेला असतो. यामुळे ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. सामान्यतः सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सर्व कामे आटोपली जातात.

जाणून घ्या सूर्यग्रहण किती वाजता होईल

ज्या दिवशी सूर्यग्रहण होईल, त्याच दिवशी मार्गशीर्ष महिन्याची अमावस्याही आहे. 4 डिसेंबर रोजी सकाळी 10:59 वाजता सूर्यग्रहण सुरू होईल आणि दुपारी 03:07 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे फक्त अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेतच दिसू शकते.

सूर्यग्रहण म्हणजे नक्की काय

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याची प्रतिमा काही काळ झाकली जाते. त्यामुळे पृथ्वीवर काही क्षण सूर्यप्रकाश नीट येत नाही आणि अंधार पडतो. या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात.

सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत

संपूर्ण सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र अचानक सूर्याच्या मध्यभागी येतो आणि पूर्णपणे झाकतो तेव्हा त्याला संपूर्ण सूर्यग्रहण म्हणतात.

आंशिक सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये अशा प्रकारे येतो की सूर्य पूर्णपणे झाकू शकत नाही, फक्त सूर्याचा काही भाग झाकतो, तेव्हा या स्थितीला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण
पृथ्वीपासून दूर राहून जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो. अशा स्थितीत फक्त सूर्याचा मध्य भाग झाकलेला असतो आणि सूर्य एखाद्या बांगडी सारखा दिसतो. त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

संबंधित बातम्या :

Shagun-Apshagun | उंदीर-चिचुंद्री घरात असणे शुभ की अशुभ, जाणून घ्या…

PHOTO | Vastu Tips : अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी स्टडी रुममध्ये लावा ‘ही’ 4 झाडे

Kaal Sarp Dosh : कुंडलीतील काल सर्प दोष दूर करण्यासाठी हे महाउपाय करा…