Som Pradosh Vrat 2021 | आज सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, व्रत आणि महादेवाच्या पूजेचं महत्व

हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्वाचा असतो. दरमहिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो (Som Pradosh Vrat 2021).

Som Pradosh Vrat 2021 | आज सोम प्रदोष व्रत, जाणून घ्या शुभ मुहूर्त, व्रत आणि महादेवाच्या पूजेचं महत्व
Lord Shiva
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 8:24 AM

मुंबई : हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्वाचा असतो (Som Pradosh Vrat 2021). दरमहिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो. यावेळी 24 मे रोजी म्हणजेच आज प्रदोष व्रत आहे. यावेळी प्रदोष व्रत सोमवारी येत आहे, म्हणून त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. हिंदूंच्या मते, सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो, म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत येतो, तेव्हा या व्रताचे महत्त्व आणखीन वाढते (Som Pradosh Vrat 2021 Know The Shubh Muhurat Puja Vidhi And Importance Of This Auspicious Day).

सोम प्रदोष व्रत 2021 तिथी आणि शुभ मुहूर्त

शुभ तिथी प्रारंभ : 24 मे रोजी सकाळी 3:38 वाजता

शुभ तिथी समाप्त : 25 मे रोजी सकाळी 12:11 वाजता

काल प्रदोष सायंकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 24 मे रोजी रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी समाप्त होईल.

सोम प्रदोष व्रत 2021 पूजा विधी

– हिंदू पुराणानुसार, प्रदोष व्रत तिथी सूर्यास्तानंतर येते, म्हणून भक्तांनी सूर्यास्तानंतरच पूजा करावी.

– पूजेपूर्वी आंघोळ करुन स्वच्छ कपडे घाला

– विधी सुरु करण्यापूर्वी पूजेची सर्व सामुग्री गोळा करा

– गंगाजल आणि फुलांनी भरलेले कलश किंवा मातीचे भांडे ठेवा.

– या दिवशी अभिषेक करणे शुभ असते, म्हणून शिवलिंगावर गंगाजल, दूध, तूप, दही, मध अर्पण करा.

– शिवलिंगाला उदबत्ती, बेलपत्र आणि धतुरा अर्पण करा

– प्रदोष व्रताची कथा वाचा, शिव चालीसा वाचा. महा मृत्युंजय मंत्राचा 108 वेळा जप करा. आरती करुन पूजा समाप्त करा.

महामृत्युंजय मंत्र

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान्मृ त्योर्मुक्षीय मामृतात्

सोम प्रदोष व्रत 2021 चे महत्त्व

हिंदू मान्यतांनुासर, जे लोक या दिवशी भगवान शिवची पूजा करतात आणि दिवसभर उपवास करतात त्यांना आरोग्य, संपत्ती, समृद्धी आणि शांततापूर्ण जीवनाचा आशीर्वाद मिळतो. तसेच, जे ग्रहांच्या अशुभ परिणामांनी ग्रस्त असतात त्यांना दिलासा मिळतो. काही महिला भक्त वरदान किंवा संतान प्राप्तीसाठी उपवास ठेवतात.

सोम प्रदोष व्रत 2021 उपवासाचे नियम

– भगवान सूर्य यांना अर्घ्य द्या

– ब्रह्मचर्याचं अनुसरण करा

– ध्यान करा आणि आपल्या अंतःकरणाशी जुळण्याचा प्रयत्न करा

– ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा

– उपवासादरम्यान फळे, दूध, साबुदाणा, शिंगाडा इत्यादीचं सेवन तुम्ही करु शकता.

– मद्य आणि तंबाखूचे सेवन टाळा

– अपशब्दांचा प्रयोग करु नका

– कांदा, लसूण, तांदूळ, गहू आणि मांसाहारी पदार्थ खाण्यास टाळा

Som Pradosh Vrat 2021 Know The Shubh Muhurat Puja Vidhi And Importance Of This Auspicious Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | ‘या’ चार राशीच्या व्यक्ती जन्मापासूनच असतात हुशार आणि क्रिएटिव्ह

Zodiac Signs | या 4 राशींचे लोक असतात अत्यंत संवेदनशील, लहान-लहान गोष्टींवरुनही चिंतेत पडतात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.