Som Pradosh Vrat : आज सोमप्रदोष व्रत, महत्त्व पुजा विधी आणि उपाय
प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. सोम प्रदोषावर भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश, भगवान कार्तिकेय आणि नंदी यांची पूजा केली जाते.
मुंबई : प्रत्येक महिन्यात 2 त्रयोदशी असतात. कृष्ण पक्षात प्रथम आणि शुक्ल पक्षात द्वितीय. सध्या चैत्र महिना सुरू असून या महिन्यातील तीसरे प्रदोष व्रत सोमवार, 17 एप्रिल 2023 रोजी पाळले जात आहे. सोमवार असल्यामुळे याला सोमप्रदोष व्रत (Som pradosh Vrat) असेही म्हणतात. या दिवशी दुपारी 3.46 पासून त्रयोदशी तिथी सुरू होत आहे. सोमप्रदोष व्रताला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की सोम प्रदोष व्रत पाळल्याने भगवान भोलेनाथ भक्तांवर खूप प्रसन्न होतात. भोलेनाथांचा त्यांच्यावर अपार आशीर्वाद आहे. इतकेच नाही तर सोम प्रदोष व्रत कुंडलीतील चंद्राची स्थितीही मजबूत करते. सोम प्रदोष व्रताबद्दल असे म्हटले जाते की या वेळी जे भक्त सोम प्रदोष व्रताची कथा वाचतात, त्यांना भोलेनाथ इच्छित वरदान देतात. चला जाणून घेऊया सोम प्रदोषाची तिथी, पूजा मुहूर्त, महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत.
सोम प्रदोष तारीख
- 17 एप्रिल, दुपारी 3:46 पासून
- प्रदोष तिथी पूर्णता- 18 एप्रिल, दुपारी 1.27 पर्यंत
- प्रदोष व्रत पूजा शुभ वेळ – 17 एप्रिल 5:45 ते 7:20
- सोम प्रदोष व्रताच्या दिवशी ऐंद्र आणि ब्रह्म योग तयार होत आहे, जो अत्यंत फलदायी योग आहे. यासोबतच पंचक कालची सावली दिवसभर राहील, पण ती शिवाच्या उपासनेत अडथळा निर्माण करत नाही. भगवान शिव हे सर्व ग्रह, नक्षत्र आणि काळाचे स्वामी आहेत, म्हणून महादेवाला महाकाल असेही म्हणतात.
सोम प्रदोष व्रताची उपासना पद्धत
- सोम प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काल म्हणजेच संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते.
- सूर्यास्ताच्या एक तास आधी स्नान करून उपवासाचा संकल्प करावा.
- संध्याकाळी पुन्हा स्नान करून शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी.
- शिवलिंगाला गायीचे दूध, दही, तूप, मध आणि गंगेच्या पाण्याने अभिषेक करावा.
- त्यानंतर शिवलिंगावर पांढरे चंदन लावून बेलपत्र, मदार, फुले इत्यादी अर्पण करा.
- शिवलिंगावर चांदी, तांब्याच्या भांड्यातून शुद्ध मध प्रवाहाच्या रूपात अर्पण करा.
- यानंतर ओम सर्व सिद्धे प्रदाय नमः मंत्राचा उच्चार करताना 108 वेळा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यानंतर विधिनुसार पूजा करून आरती करावी.
सोम प्रदोष व्रताचे महत्त्व
प्रदोष व्रत भगवान शिवाला समर्पित आहे. सोम प्रदोषावर भगवान शिव, देवी पार्वती, भगवान गणेश, भगवान कार्तिकेय आणि नंदी यांची पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार, जे या दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि संपूर्ण दिवस उपवास करतात त्यांना आरोग्य, संपत्ती, समृद्ध आणि शांत जीवन प्राप्त होते. तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना सोम प्रदोषामुळे आराम मिळेल. त्यांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो तसेच त्यादिवशी संबंधित ग्रहांचे लाभही मिळतात. काही स्त्री भक्त योग्य वर किंवा मूलं मिळावे म्हणून सोम प्रदोष व्रत करतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)