Somwar Upay : सोमवारच्या दिवशी अवश्य करा हे उपाय, होतील सर्व ईच्छा पुर्ण
या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते. पुराणानुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात.
मुंबई : सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे. या दिवशी विशेष पूजा केली जाते. असे म्हणतात की भोलेनाथ अतिशय दयाळू असून भक्तांवर सहज प्रसन्न होतात. या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे आणि त्यांच्याशी संबंधित काही विशेष उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते. पुराणानुसार शिवलिंगावर काही विशेष वस्तू अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा इतर कोणतीही समस्या येत असेल तर सोमवारी काही खास उपाय (Somwar Upay) अवश्य करा. सोमवारी भोलेनाथ कसे प्रसन्न होतात ते जाणून घेऊया.
सोमवारी करा हे उपाय
- सोमवारी शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालणे खूप शुभ मानले जाते.त्यानंतर त्यावर चंदन आणि भस्म लावा, त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा आणि शमीपत्र अर्पण करा. असे केल्याने शिव प्रसन्न होऊन घरामध्ये सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.
- सोमवारी रुद्राभिषेक करणे देखील खूप चांगले आहे. शिवाचा रुद्राभिषेक वेगवेगळ्या इच्छेसाठी वेगवेगळ्या गोष्टींनी केला जातो. शिवलिंगावर
- तुपाचा अभिषेक केल्याने संतानसुख प्राप्त होते असे मानले जाते. दुसरीकडे, गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्याने दुःख आणि पापांपासून मुक्ती मिळते.
- आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर सोमवारी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण होतात.
- सोमवारी शिवमंदिरात दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी कच्च्या तांदळात काळे तीळ मिसळून त्याचे दान केल्यास पितृदोष दूर होतो.
- या दिवशी शिव मंत्र ओम नमः शिवाय 108 वेळा जप करणे देखील खूप शुभ आहे. सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण केल्याने वैवाहिक जीवन सुखी होते.
- सोमवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवाची पूजा करावी. असे मानले जाते की या दिवशी घरातून बाहेर पडताना चंदनाचा तिलक लावल्यास सर्व कामे सफल होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)