Somwar Upay : मानसिक समस्येने असाल त्रस्त तर सोमवारी अवश्य करा हे उपाय

फक्त जलाभिषेक केल्याने देखील महादेव भक्तांवर प्रसन्न होतात.  दुसरीकडे अनेक जण सोमवारी उपवास करून शिवलिंगाची पूजा करतात. याशिवाय महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर या दिवशी काही खास उपायही करता येतात. 

Somwar Upay : मानसिक समस्येने असाल त्रस्त तर सोमवारी अवश्य करा हे उपाय
शिवलींगImage Credit source: Social media
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 11:38 AM

मुंबई : सोमवार हा देवादी देव महादेवाला समर्पित आहे. या दिवशी महादेवाची विधीवत आराधना केल्यास इच्छित फळ प्राप्त होते. देवलोकातील सर्व देवतांमध्ये भगवान शिव सर्वात सहज प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. फक्त जलाभिषेक केल्याने देखील महादेव भक्तांवर प्रसन्न होतात. दुसरीकडे अनेक जण सोमवारी उपवास करून शिवलिंगाची पूजा करतात. याशिवाय महादेवाला प्रसन्न करायचं असेल तर या दिवशी काही खास उपायही करता येतात.  या उपायांनी तुमचे कोणतेही काम यशस्वी रित्या पार पडते. यासोबतच तुम्ही जर मानसिक समस्यांचा सामना करत असाल तर त्यापासून मुक्ती मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काही प्रभावी उपायांबद्दल (Somwar Upay).

गायत्री मंत्र

गायत्री मातेला वेदमाता म्हणतात. आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी आणि प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी सोमवारी माँ गायत्री किंवा माँ सरस्वतीच्या चित्रासमोर बसून गायत्री मंत्राचा 11, 21 किंवा 51 वेळा जप करा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि लवकरच यशाचे दरवाजे उघडतील.

गायत्री मंत्र – ‘ॐ भूर भुवः स्वः तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहिधियो यो नः प्रचोदयत’ असे केल्याने तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील आणि तुमची जीवनात प्रगती होईल.

हे सुद्धा वाचा

शमीचे झाडं

प्रत्येकाला आयुष्यात प्रगती हवी असते तसेच कुटुंबातही आनंद हवा असतो. म्हणूनच ज्योतिष शास्त्रानुसार कौटुंबिक सुख टिकवायचे असेल तर सोमवारी शमीच्या झाडाचे ध्यान करावे आणि दोन मिनिटे हात जोडून त्या झाडाला नमस्कार करावा. असे केल्याने तुमचा कौटुंबिक आनंद कायम राहील.

वैवाहिक सुखासाठी

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वैवाहिक जीवनाला एखाद्याची वाईट नजर लागली आहे आणि पती-पत्नीमध्ये प्रेमाची कमतरता आहे, तर तुम्ही या राहूच्या मंत्राचा 5 वेळा जप करावा.

राहु मंत्र- ‘ओम भ्रम भ्रम स: राहावे नम:’ असे केल्याने तुमच्या वैवाहिक नात्यावर कोणाचीही वाईट नजर पडणार नाही.

मानसिक त्रास दूर करण्यासाठी

जर तुम्ही बऱ्याच काळापासून काही मानसिक समस्यांनी त्रस्त असाल आणि तुमचे काम नीट होत नसेल तर सोमवारी शिवलिंगावर थोडेसे दूध पाण्यात मिसळून अभिषेक करा. या उपायाने तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.