दर सोमवारी करा हे विशेष उपाय, जीवनात कधीच येणार नाही आर्थिक तंगी
भगवान महादेव आपल्या भक्तांच्या सर्व समस्या दूर करतात. दर सोमवारी केलेल्या उपायामुळे आर्थिक तंगी दूर होते.
मुंबई, हिंदू धर्मात प्रत्येक देवतेच्या उपासनेसाठी एक विशेष दिवस समर्पित करण्यात आला आहे. तसेच सोमवारचा (Somwar Upay) दिवस देवांचे देव महादेव यांना समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने साधकाच्या आयुष्यातलय अडचणी दूर होतात व सुख समृद्धी लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक मान्यतांनुसार, भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कठीण उपाय करण्याची गरज नाही. भगवान शिव आपल्या भक्तांवर लवकरच प्रसन्न होतात.
सोमवारी संध्याकाळी करावयाचे सोपे व विशेष उपाय
- सुख आणि समृद्धीसाठी उपाय- साधकाला आपल्या आराध्य दैवत महादेवाचा आशीर्वाद मिळवला असेल तर त्यांनी सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावे. गंगाजल अर्पण करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात.
- नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय- नोकरी-व्यवसायातील अडचणींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावर मधाची धारा अर्पण करावी. या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील.
- संपत्ती वाढवण्यासाठी उपाय- सोमवारी संध्याकाळी भगवान शंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. चंदनाचा गुणधर्म थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाचा तिलक लावणे उत्तम मानले जाते.
- प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय- जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथला फुले, नैवेद्य आणि अक्षत अर्पण करावे. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात.
हे सुद्धा वाचा
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)