Somwati Amavasya 2023 : पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्या आहे महत्त्वाची, अवश्य करा हे उपाय
पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस विशेष मानला जातो. पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
मुंबई : श्रावण महिन्यातील (Shrawan 2023) अमावास्येला सोमवती अमावस्या म्हणतात. पितृदोष (Pitrudosh Upay) दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येचा (Somwati Amavasya 2023) दिवस खास आहे. यावर्षी सोमवती अमावस्या सोमवार, 17 जुलै 2023 रोजी येत आहे. तसेच सोमवारी येत असल्याने या दिवशी श्रावण सोमवार व्रत देखील पाळले जाणार आहे. अशाप्रकारे व्रत पाळल्यास दुप्पट फळ मिळण्याची संधी मिळते.
पितरांना प्रसन्न करण्याची संधी
पितृदोष दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस विशेष मानला जातो. पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान, श्राद्ध, तर्पण, पिंडदान करावे. त्यामुळे पितृदोष दूर होऊन जीवनात येणाऱ्या अडचणी, धनहानी, कष्ट, आजारपण, विवाहातील अडथळे, संततीतील अडथळे इत्यादी दूर होतात.
सोमवार देखील सोमवती अमावस्या दिवशी येत असल्याने या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक करा. यावेळी श्रावणातील अमावस्या तिथी रविवार, 16 जुलै रोजी रात्री 10.08 ते 18 जुलै मध्यरात्री 12.01 पर्यंत असेल. अशा स्थितीत स्नान, दान आणि पूजेचा शुभ मुहूर्त सोमवार, 17 जुलै रोजीच राहील.
सोमवती अमावस्या 2023 रोजी पितृ दोष उपाय
श्रावण अमावस्येच्या दिवशी महादेवाची पूजा केल्यानंतर शिव गायत्री मंत्र – ‘ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय च धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात’. किमान 108 वेळा जप करावा. हा उपाय पूर्ण श्रावण महिन्यात केल्यास उत्तम. पितृदोषासह कुंडलीतील सर्व ग्रह दोष दूर होतील.
सोमवती अमावस्येला सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा करा. पिंपळाच्या झाडाच्या मुळास पाणी आणि दूध अर्पण करावे. जाणवे अर्पण करा. तेलाचा दिवा लावा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करा. 108 वेळा पिंपळाच्या झाडाभोवती फिरा. या उपायाने पितृदोष दूर होतो. पूर्वज प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात.
श्रावणातील सोमवती अमावस्येला भगवान शिवाची पूजा करा. त्यानंतर ‘ओम नमः शिवाय’ मंत्राचा उच्चार करताना भोलेनाथला 21 मदार किंवा आक फुले अर्पण करा. यासोबत बेलपत्र, धतुरा, दूध, दही यांनी पूजा करावी. पितृदोष दूर होण्यासाठी भगवान शंकराची प्रार्थना करा. तुमचे सर्व त्रास आणि समस्या दूर होतील.
पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येला कुत्रा, गाय, कावळा इत्यादींना भोजन अर्पण करावे. पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद मिळविण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)