अनेकजण आयुष्यात प्रचंड मेहनत (Hard work) घेतात. त्यांच्या ध्येयाबद्दल ते सदैव जागरुकही असतात पण बऱ्याचदा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. यामागे काही तांत्रिक कारणे असू शकतात. हिंदू धर्मात अशा काही गोष्टी किंवा तोडगे सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे प्रयत्नांना नशिबाचे (good Luck) पाठबळ लाभते. ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात त्यांना यश (Success Tips) मिळण्याची शक्यता वाढते. नशीब चमकणं आणि दुर्दैव, हे सर्व आपल्या दैनंदिन कामे आणि आपल्या कृतींवर अवलंबून असते. सकाळी उठल्यानंतर नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात, ज्या केल्याने नशिबाची साथ आपल्याला लाभेल याबद्दल शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिकतेची जोड फार आवश्यक असते. प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जा मिळाल्याने त्याच्या पूर्ततेची शक्यता अधिक वाढते. जाणून घेऊया अशाच काही उपायांबद्दल.
अनेकदा तुम्ही ऐकले असेल की सकाळी उठल्यावर आपला तळहाता पाहावा. धार्मिक मान्यतेनुसार माता लक्ष्मी, माता सरस्वती आणि भगवान विष्णू आपल्या दोन्ही तळहातामध्ये वास करतात, त्यामुळे सकाळी उठून दोन्ही हात जोडून ‘कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती। करमूले तु गोविन्द: प्रभाते करदर्शनम्।।’ असा जप करा आणि नंतर हाताच्या तळव्यांकडे पहा.
हिंदू धर्मात असे अनेक मंत्र आहेत, ज्यांच्या जपाचा धार्मिक ग्रंथात उल्लेख आहे. त्यापैकी एक गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्राचा नियमित जप केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि दारिद्र्य दूर होते. याशिवाय त्या व्यक्तीला आयुष्यातील प्रत्येक कामात यश मिळते.
हिंदू धर्मात प्रत्येक घरात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. जर तुम्हालाही तुमच्या दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यामध्ये करायचे असेल तर सकाळी नियमितपणे उठून स्नान करून तुळशीला तुपाचा दिवा लावावा.
सकाळी लवकर उठल्यानंतर नियमित स्नान करून तांब्याच्या कलशात पाणी, रोळी, अक्षत, साखरेची मिठाई आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, तसेच समाजात मान-सन्मान वाढतो आणि आपल्या क्षेत्रात प्रगती होते.