Premanand Maharaj : मी इतके वर्ष जगणार, प्रेमानंद महाराजांचा वयाविषयी मोठा दावा, किडनीच्या आजाराने त्रस्त, म्हणाले…
Premanand Maharaj Age : प्रेमानंद महाराज सध्या अनेकांसाठी मोठे मार्गदर्शक आहेत. अनेक जण त्यांच्या व्यथा, अडचणी त्यांच्यासमोर मांडतात. ते साध्या स्वरूपात त्यातून मार्ग काढण्याचा उपाय सांगतात. त्यांनी वयाविषयी एक मोठा दावा केला आहे.

प्रेमानंद महाराज सध्या सोशल मीडियातच नाही तर वृदांवनात प्रसिद्ध आहेत. त्यांचा प्रभाव केवळ लाखो भाविकांवरच नाही, तर लोकप्रिय बॉलिवूड सेलेब्रिटी, नेते आणि क्रिकेटर्सवर दिसून येतो. त्यांच्या आध्यात्मिकतेतून ते अनेकांना उपाय सांगतात. ते बुवावाजी, चमत्कारावर प्रहार करताना दिसतात. ढोंगीपणावर ते सतत टीका करतात. त्यांचे जीवन संघर्षमय आहे. त्यांनी एका व्हिडीओत गेल्या 20 वर्षांपासून किडनीच्या गंभीर आजाराशी ते लढत असल्याचे सांगितले. तरीही ते अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्यांच्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मकता आली आहे. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना किडनीचा आजार असला तरी त्यांचा सकारात्मक विचार अनेकांना प्रेरणा देतात. ते दीर्घायुषी असावेत अशी प्रार्थना भक्त करतात.
अनेकांसाठी पॉवर हाऊस
प्रेमानंद महाराजांच्या मूत्रपिंडाच्या (Kidney) आजाराने भक्त पण चिंतेत आहेत. ते या आजाराने अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत. अर्थात त्यांचे जीवन आणि त्यांचे अनुभव केवळ आजारांपुरते मर्यादीत नाहीत. तर आध्यात्मिक मार्गावर चालताना ते अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरले आहेत. त्यांचे विचार अनेकांना जगण्याचे बळ देतात. त्यांना प्रेरित करतात. जीवनाचा खरा आनंद हा आत्मज्ञान आणि ईश्वर भक्तीत असल्याचे ते मानतात. त्यांनी त्यांचे आयुष्य किती असेल, ते किती वर्ष जगतील याविषयी मोठा दावा केला आहे.




किडनीने त्रस्त, आयुष्याविषयी मोठा दावा
प्रेमानंद महाराजांनी अनेक व्हिडिओत त्यांच्या किडनीच्या आजाराविषयी माहिती दिली आहे. गेल्या 20 वर्षोंपासून ते या आजाराने त्रस्त आहेत. या मोठ्या शारीरिक व्याधीशी दोन हात करताना त्यांच्या लक्षात आले की आपण अल्पआयुषी आहोत. त्यांना असे वाटले की आपण फारसं जगू शकणार नाही. पण त्यांच्या जीवनात एक दिव्य संत आले. त्यांनी ते 80 वर्षे जगतील असे सांगितले. प्रेमानंद महाराज यांनी सांगितले की हे दिव्य संत त्यांना 20 वर्षांपूर्वी भेटले होते. आता त्यांचे वय 55-56 वर्षा दरम्यान आहे. गेल्या 20 वर्षांत आजाराशी संबंधित उपचार सुरू आहेत. इतक्या व्यापातही ते अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. अनेक भक्त त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. अनेकांच्या जीवनात त्यांच्या काही विचारांनी क्रांती आणली आहे. सोशल मीडियातील अनेक व्हिडिओत याविषयी अनेकांचे काही ना काही दावे आहेत.
(डिस्क्लेमर : सर्वसाधारण माहितीवर हा लेख आहे. टीव्ही ९ मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.)