Spiritual: ‘या’ चार चुकांमुळे होते धनहानी; तुम्हीही करत असाल तर लगेच व्हा सावध!
आयुष्यात धनलाभ (Dhanlabh) आणि धनहानी (Dhanhani) हे असे उत्तर चढाव आहे ज्याचा मनुष्याच्या जीवनावर मोठ्यापर्यंत फरक पडतो. धनलाभ झाल्यास आपण खुश असतो हे दिवस कधीच संपू नये असे वाटते. याच्याच उलटे धनहानीचे दिवस असतात. धनहानीमुळे’आपल्या वैयक्तिक आयुष्यासह कुटुंबावरही वाईट दिवस येतात. आर्थिक चणचण असताना ज्यांना आपण जवळचे मानायचो आणि आपल्या कधीं प्रसंगी आपल्याला साथ देतील […]
आयुष्यात धनलाभ (Dhanlabh) आणि धनहानी (Dhanhani) हे असे उत्तर चढाव आहे ज्याचा मनुष्याच्या जीवनावर मोठ्यापर्यंत फरक पडतो. धनलाभ झाल्यास आपण खुश असतो हे दिवस कधीच संपू नये असे वाटते. याच्याच उलटे धनहानीचे दिवस असतात. धनहानीमुळे’आपल्या वैयक्तिक आयुष्यासह कुटुंबावरही वाईट दिवस येतात. आर्थिक चणचण असताना ज्यांना आपण जवळचे मानायचो आणि आपल्या कधीं प्रसंगी आपल्याला साथ देतील असा आपला विश्वास असायचा तेसुद्धा पाठ फिरवतात. माता लक्ष्मी ही धनदेवीचे रूप असते. ज्या व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा असते त्याला जीवनात प्रत्येक सुखसुविधा मिळतात. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की तिच्यावर लक्ष्मी मातेची कृपा असावी. धार्मिक ग्रंथ तसेच ज्योतिषातही लक्ष्मी मातेचा महिमा आणि तिला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत. मात्र काही उपाय न करताही काही गोष्टी ध्यानात ठेवल्या तर लक्ष्मी मातेची कृपा मिळवता येते.
सकाळी उशिरा उठणे
शास्त्रात सूर्योदयाच्या आधी उठण्यासाठी योग्य काळ सांगितला आहे. असे मानले जाते की ब्रम्ह मुहूर्तावर उठणे लाभदायक असते. जी व्यक्ती सूर्योदयानंतर उठते तिच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहत नाही. तसेच संध्याकाळच्या वेळेस झोपणेही अशुभ मानले गेले आहे. संध्याकाळच्या वेळेस झोपणाऱ्या व्यक्तीला आर्थिक समस्या जाणवतात.
आसपास स्वच्छता न ठेवणे
ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी मातेला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. यासाठी म्हटले जाते की लक्ष्मी मातेला घरी बोलावण्यासाठी घर साफ ठेवणे गरजेचे असते. जी व्यक्ती घरात साफ-सफाई ठेवत नाही तेथे लक्ष्मी माता राहत नाही. नियमितपणे सकाळच्या वेळेस साफ-सफाई केल्यास घरात लक्ष्मी मातेचा वास राहतो.
मीठ हातात देणे
ज्योतिषशास्त्रात आणि धार्मिक ग्रथांमध्ये सांगितले आहे की, मीठ हातात देण्याची सवय माणसाला दारिद्रतेकडे नेते. हिंदू धर्मात मिठाला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. हातात मीठ देण्याच्या सवयीने लक्ष्मी नाराज होते. असं म्हणतात की जेव्हा तुम्ही एखाद्याला मीठ देता ते एखाद्या भांड्यातून द्यावे.
ताटात जेवण टाकणे
शास्त्रात सांगितले आहे की, अन्नाचा संबंध लक्ष्मी मातेशी असतो. अनेकदा लोक ताटात जेवण टाकतात. अन्न वाया घालवल्याने लक्ष्मीचा अपमान होतो. अन्न वाया घालवल्याने त्या कुटुंबाला दारिद्रयाचा सामना करावा लागतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)