Spiritual: मंगळवारी अशा प्रकारे करा हनुमानाची पूजा; सर्व संकटं होतील दूर

जोतिष्यशास्त्रानुसार (Astrology) ज्यांच्या कुंडलीत  मंगळ ग्रह आहे अशाने दर मंगळवारी हनुमानाची पूजा (Hanuman Puja) केल्याने अनेक लाभ मिळतात. याशिवाय मंगळवारी उपवास केल्याने धैर्य आणि शक्ती प्राप्त होते. प्रयत्नांना यश प्राप्त होते. हितशत्रूंपासून रक्षण करण्यासाठी मंगळवारी हनुमानाची उपासना करणे लाभदायक आहे. मंगळवारी हनुमानाची उपासना करणाऱ्यावर कुठल्याच प्रकाच्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही. बजरंगबली त्याचे रक्षण करते. […]

Spiritual: मंगळवारी अशा प्रकारे करा हनुमानाची पूजा; सर्व संकटं होतील दूर
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 11:14 AM

जोतिष्यशास्त्रानुसार (Astrology) ज्यांच्या कुंडलीत  मंगळ ग्रह आहे अशाने दर मंगळवारी हनुमानाची पूजा (Hanuman Puja) केल्याने अनेक लाभ मिळतात. याशिवाय मंगळवारी उपवास केल्याने धैर्य आणि शक्ती प्राप्त होते. प्रयत्नांना यश प्राप्त होते. हितशत्रूंपासून रक्षण करण्यासाठी मंगळवारी हनुमानाची उपासना करणे लाभदायक आहे. मंगळवारी हनुमानाची उपासना करणाऱ्यावर कुठल्याच प्रकाच्या नकारात्मक शक्तीचा प्रभाव होत नाही. बजरंगबली त्याचे रक्षण करते. या दिवशी तिळाच्या तेलात काळे जव टाकून हनुमानाला अर्पण करावे. रुईच्या फुलांचा किंवा पानांचा हार हनुमानाला अर्पण करावा याने आपल्यातली नकारात्मक ऊर्जा नाश पावते. मंगळवारी बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी व्रताच्या दिवशी सूर्योदयापूर्वी. आंघोळ करून घराच्या ईशान्येला हनुमानजीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.

धुतलेले वस्त्र परिधान करून हातात पाणी घेऊन व्रताचा संकल्प सोडावा. त्यानंतर हनुमानासमोर तुपाचा दिवा लावा आणि फुलांच्या माळा किंवा फुलं अर्पण करा. त्यानंतर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा म्हणा. हनुमान चालीस वाचून झाल्यावर आरती करा आणि प्रसादाचे वाटप करा. संध्याकाळी हनुमानजींची पवित्रतेने पूजा करून त्यांच्यासमोर दिवा लावा.  2 मंगळवार हे व्रत केल्यास विशेष लाभ होतो. शक्य असल्यास ब्राह्मणाला भोजनदान करा.

हनुमानाच्या जन्माची पौराणिक कथा

हनुमंताला महादेवांचा 11वा रूद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभु श्री रामाचे उत्कट भक्त आहेत. हनुमान जींचा जन्म वानर जातीमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव अंजना, आणि वडील वानराज केसरी असे आहे. यामुळे त्यांना आंजनाय आणि केसरीनंदन या नावाने देखील ओळखलं जातं. सूर्याच्या वरातून सुवर्ण निर्मित सुमेरु येथे केसरीचे राज्य होते. त्यांची अती सुंदर अंजना नावाची स्त्री होती. एकदा अंजना यांनी शुचिस्नान करुन सुंदर वस्त्राभूषण परिधान केले. त्यावेळी पवन देवाने त्यांच्या कर्णरंध्रात दाखल होऊन आश्वस्त केले की आपणास सूर्य, अग्नि आणि सुवर्णासारखा तेजस्वी, वेदज्ञाता, महाबली पुत्र प्राप्त होईल आणि तसेच घडले.

हे सुद्धा वाचा

अंजनाच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. दोन प्रहरानंतर सूर्योदय होताच त्याला भूक लागली. आई फळं घेण्यास गेली तर इकडे लाल वर्णाच्या सूर्याला फळ समजून हनुमानाने त्याला धरण्यासाठी आकाशात उडी मारली. त्या दिवशी आमावस्या असल्यामुळे सूर्याचा ग्रास करण्यासाठी राहू आला होता परंतू हनुमानाला दुसरा राहू समजून त्याने पळ काढला. तेव्हा इंद्राने हनुमानाला वज्र-प्रहार केला याने त्यांची हनुवटी वक्र झाली तेव्हा पासून ते हनुमान म्हणून ओळखले जातात.

इंद्राच्या या दृष्टपणाला शिक्षा देण्यासाठी पवन देवाने प्राण्याचे वायु संचलन थांबविले. तेव्हा ब्रह्मादि सर्व देवतांनी हनुमानास वर दिले. ब्रह्मांनी अमितायु, इंद्राने वज्राने पराभूत न होण्याचा, सूर्याने आपल्या शतांश तेज युक्त आणि संपूर्ण शास्त्र तज्ञ असण्याचा, वरुणांनी पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा, यमाने यमदंडाने अवध्य आणि पाशने नष्ट न होण्याचा, कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदाने निःशंख राहण्याचा, शंकराने प्रमत्त आणि अजेय योद्धांवर विजय प्राप्त करण्याचा आणि विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकाराचे दुर्बोध्य आणि असह्य, अस्त्र, शस्त्र व यंत्रादिने काहीही क्षती न होण्याचा वर दिला.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.