महाकुंभ मेळाव्यात कोणत्या साधूच्या आश्रमात मुक्कामाला आहे स्टीव जॉब्सची पत्नी, काय आहे कनेक्शन?

दीक्षा घेतल्यापासून स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल सातत्यानं आपल्या गुरूच्या संपर्कात आहे. सध्या ती भारत दौऱ्यावर असून, आपल्या गुरुच्या आश्रमात वास्तव्यास आहे.

महाकुंभ मेळाव्यात कोणत्या साधूच्या आश्रमात मुक्कामाला आहे स्टीव जॉब्सची पत्नी, काय आहे कनेक्शन?
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 8:01 PM

महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी लाखो साधू प्रयागराजमध्ये आले आहेत. मात्र या महाकुंभ मेळ्यामध्ये असे देखील एक साधू आहेत, ज्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. हे साधू दुसरे तिसरे कोणी नसून अ‍ॅप्पलचे फाउंडर स्टीव जॉब्स यांची पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्सचे गुरु आहेत.स्टीव जॉब्सची पत्नी सध्या त्यांच्याच कुंभमेळ्यात लावण्यात आलेल्या कॅम्पमध्ये राहात आहे.लॉरेन पॉवेलवर तिच्या गुरुचा एवढा प्रभाव आहे की,तीने केवळ तिच्या गुरुचं गोत्रच स्विकारलं नाही तर तीने आपल्या नावात देखील हिंदू धर्मानुसार बदल केला आहे.जाणून घेऊयात नेमके कोण आहेत लॉरेन पॉवेलचे गुरु?

उत्तराखंडच्या हरिद्वार स्थित सिद्धपीठ श्री दक्षिण काली मंदिराचे महंत आणि जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी हे लॉरेन पॉवेलचे गुरू आहेत.कैलाशानंद गिरी यांचा आश्रम हरिद्वारमध्ये आहे. मात्र सत्सगांच्या निमित्तानं त्यांचा प्रवास संपूर्ण भारतभर असतो. समोर आलेल्या माहितीनुसार लॉरेन पॉवेल कैलाशानंद गिरी यांचे कार्यक्रम टीव्हीवर बघायची. त्यामुळे त्यांचा मोठा प्रभाव तिच्यावर पडला. तीने तेव्हापासूनच कैलाशानंद यांना आपले गुरू मानले. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी ती आपल्या गुरूच्या दर्शनसाठी हरिद्वारला पोहोचली. तीने फक्त गुरुंचं दर्शनच नाही घेतलं तर पूर्ण विधीसह शास्त्रोक्त दीक्षा देखील घेतली.

लॉरेन दहा दिवस आश्रमात राहणार

दीक्षा घेतल्यापासून ती सातत्यानं आपल्या गुरूच्या संपर्कात आहे. सध्या ती भारताच्या दौऱ्यावर असून, ती आपले गुरू कैलाशानंद गिरी यांच्या कुंभमेळ्यात लागलेल्या कॅम्पमध्ये मुक्कामी आहे. लॉरेन प्रयागराजला येण्यापूर्वी काशीला देखील गेली होती, तीथे तीने काशी विश्वेशरांचं दर्शन घेतलं, पूजा केली. त्यानंतर ती आपले गुरू कैलाशानंद गिरी यांच्या आश्रमात आली आहे, तीथे ती दहा दिवस राहणार असून, आपला सगळा वेळ भजन किर्तनात घालवणार आहे. महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली असून, भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. लाखो साधू या महाकुंभ मेळाव्यात सहभागी झाले आहेत.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.