AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stranger Things | ऐकावे ते नवलच, इथे देवाला वाहिले जातात चक्क दगड, जाणून घ्या महाराष्ट्राच्या कुठल्या गावात आहे ही परंपरा

हिंदू धर्मात देवांच्या पुजेला खूप महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक जण आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या परीने देवाला खूश ठेवत असतो.

Stranger Things | ऐकावे ते नवलच, इथे देवाला वाहिले जातात चक्क दगड, जाणून घ्या महाराष्ट्राच्या कुठल्या गावात आहे ही परंपरा
sindhugurg
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 11:16 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात देवांच्या पुजेला खूप महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येक जण आपल्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या परीने देवाला खूश ठेवत असतो. आता पर्यंत तुम्ही देवाला चिकन मटनचा नेवैद्य म्हणून देताता किंवा राजस्थानमधील जयपूर येथे देवीच्या देवळात उंदिर असतात अशी अनेक विचित्र उदाहरणे पाहिली किंवा वाचली असतील पण आपल्या महाराष्ट्रातील चिपळूण – गुहागर रस्त्यामध्ये एक ढीगाची पुजा केली जाते. या रस्तात 7 ते 10 फुटाचा एक भला मोठा दगडाचा ढीग नजरेत पडतो. हा ढीग पाहिलात की प्रथमदर्शनी रस्त्याचे काम शिल्लक राहिली रेती आपल्याला भासते. पण हा मातीचा ढीग अनेक पिढ्यांपासून इथेच आहे. या ढिगाऱ्याला इथे देवाचं स्थानाचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

गडगोबाला स्मरण महाराष्ट्रात अनेक देवस्थाने आहेत, प्रत्येक भागातील देवस्थानचे तिथले एक वेगळे वैशिष्ट्य पहायला मिळतात. पण गडगोबा हे असे स्थान आहे जिथे ना घंटा, ना मंदिर, ना मूर्ती. केवळ दगडाच्या ढिगाऱ्यात परमेश्वर असल्याची श्रध्दा मनाशी बाळगून या मार्गावरून येणारा जाणारा स्थानिक आजही गडगोबाला दगड अर्पण करूनच पुढच्या प्रवासाला जातो. ही परंपरा आजही अखंडित सुरू आहे. वर्षातून एकदा शिमग्याच्या वेळी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्र जमून गडगोबाला स्मरण करतात. कोकणात अनेक अशी देवस्थाने आहेत जी महाराष्ट्र देखील प्राचिलीत आहेत. अशी महिती स्थानिकांनी दिली.

ठेकेदाराचा ढिगाळ कारभार गुहागर विजापूर महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी गडगोबाचे स्थान एका कोपऱ्यात असल्यामुळे दुर्लक्षित होते, मात्र महामार्गाच्या कामात हे स्थान मध्येच आल्यामुळे हा ढीग काढून टाकायचा असा निर्णय ठेकेदाराने घेतला होता,पण प्रत्यक्ष ढिगारा हटवण्यास सुरवात झाली त्यावेळी अनेक ब्लास्ट करूनही इथले दगड फुटले नाहीत,शिवाय या मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काही भास झाल्याचेही स्थानिक सांगतात. खरंतर हा ढिगारा काढू नये यासाठी पाटपन्हाळे गावातुन कधीच विरोध झाला नाही, पण तरीही ठेकेदाराने प्रशासनाची स्वताच बोलून हा ढिगारा तसाच मधोमध ठेवायचा निर्णय घेत बाजूने रस्ता केलाय.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या :

Surya Grahan 2021| भूक आवरत नाही? ग्रहण काळातही खायचंय, तर हा उपाय करा आणि निर्धास्त राहा

Chanakya Niti | या 4 गोष्टींना चुकूनही पायाने स्पर्श करु नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल…

Lord Ganesha | जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी श्रीगणेशाची मनोभावे आराधना करा

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.