Sunday Upay : रविवारच्या दिवशी चुकूनही करू नये ही पाच कामं, सुख समृध्दीचा होऊ शकतो नाश
ज्या व्यक्तीवर सूर्यदेवाची कृपा असते, तो सदैव निरोगी राहतो आणि जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती प्राप्त करतो. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने ती व्यक्ती जीवनात खूप प्रगती करते.
मुंबई : सनातन धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित मानला गेला आहे. त्याचप्रमाणे रविवार (Sunday upay) हा ग्रहांचा राजा सूर्य देवाला समर्पित मानला जातो. असे मानले जाते की ज्या व्यक्तीवर सूर्यदेवाची कृपा असते, तो सदैव निरोगी राहतो आणि जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती प्राप्त करतो. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने ती व्यक्ती जीवनात खूप प्रगती करते. ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की, लोकांनी रविवारी काही काम करू नये. असे न केल्याने कुटुंबात संकटाचा काळ सुरू होतो आणि घरात गरिबी येऊ लागते.
हे काम रविवारी करू नये
मांसाहार करू नका
रविवारी मांस आणि मद्य सेवन करू नये असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. यासोबतच शनिदेवाशी संबंधित पदार्थ खाणे टाळावे. असे न केल्यास सूर्य आणि शनि या दोघांचा कोप वाटून घ्यावा लागतो.
या दिशेला प्रवास करणे टाळा
रविवारी पश्चिम दिशेला प्रवास करणे निषिद्ध मानले जाते. असे म्हणतात की या दिवशी पोटशूळ या दिशेला राहतो, त्यामुळे त्या दिशेला प्रवास करणाऱ्या व्यक्तीसोबत अशुभ होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला सक्तीने प्रवास करावा लागला तरी तूप किंवा दलिया खाल्ल्यानंतर निघावे.
या रंगांचे कपडे घालू नका
असे मानले जाते की रविवारी काळे, निळे किंवा तपकिरी रंगाचे कपडे घालू नयेत. या रंगांचे कपडे परिधान केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ज्यामुळे घरामध्ये रोग आणि गरिबी प्रवेश करते.
या गोष्टी विकू नका
रविवारी सूर्यदेवाशी संबंधित कोणतीही वस्तू विकू नये असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. असे केल्याने कुंडलीची स्थिती कमकुवत होते आणि आयुष्यात दुर्दैवाचा प्रवेश होतो. यासोबतच रविवारी घरात तांब्याशी संबंधित वस्तू विकू नयेत.
सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण करा
रविवारी सूर्यास्तापूर्वी अन्नग्रहण करावे, असे धार्मिक अभ्यासक सांगतात. यासोबतच त्या दिवशी मीठ न खाण्याचा किंवा कमी खाण्याचा प्रयत्न करावा. असे न केल्याने व्यक्तीला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते आणि अनेक कामांमध्ये अडथळे येतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)