Sunday Upay: मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत? रविवारी ‘या’ गोष्टी अवश्य करा

रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी केलेल्या काही उपायांनी मनातील इच्छा पूर्ण होतात. जाणून घेऊया या उपायांबद्दल

Sunday Upay: मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत? रविवारी 'या' गोष्टी अवश्य करा
रविवार उपाय Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 9:04 PM

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) प्रत्येक दिवस विशिष्ट ग्रहाशी आणि देवतेशी संबंधित असल्याचे मानले जाते. रविवार भगवान सूर्यदेव यांना समर्पित आहे. या दिवशी सूर्याची पूजा केली जाते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते. सूर्य ग्रहाला सर्व ग्रहांचा राजा म्हणतात. रविवारी (Sunday Tips) सूर्यदेवाला जल अर्पण करताना सूर्याची पूजा केल्याने आणि मंत्राचा 108 वेळा जप केल्यास प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य कमजोर असतो. त्यांनी रविवारी काही विशेष उपाय करावेत.

रविवारी ‘या’ गोष्टी करणे टाळा

  1. मीठ खाऊ नये: ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी सूर्यास्तानंतर मीठ वापरू नये. असे केल्याने पत्रिकेतील सूर्य कमजोर होतो आणि त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. धन आणि आरोग्याची हानी होते.
  2. तामसिक अन्नाचे सेवन: ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की, रविवारी तामसिक अन्नाचे सेवन टाळावे. या दिवशी मांस, मासे, मद्य सेवन करू नये. त्यामुळे सूर्यदेव नाराज होतात.
  3. कपड्यांची निवड: रविवारी काळे, निळे आणि हिरवे कपडे घालू नयेत. हा रंग शनिदेवाला खूप प्रिय आहे पण सूर्यदेवाला हा रंग अप्रिय आहे. त्यामुळे रविवारी या रंगांचे कपडे परिधान केल्यास नुकसान होऊ शकते.

या गोष्टी अवश्य करा

  1. शास्त्रानुसार घरातील सर्वांनी रविवारी कपाळावर चंदनाचा टिळा लावावा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनाचा वर्षाव होतो.
  2. हे सुद्धा वाचा
  3.  रविवारी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडावर चार तोंडी दिवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने संपत्ती वाढते आणि संकटे संपतात.
  4.  पिठाचे गोळे करून रविवारी माशांना खाऊ घाला. असे मानले जाते की, माशांना पिठाच्या गोळ्या खायला दिल्यास आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
  5.  रविवारी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुपाचे दिवे लावा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते.
  6.  जर तुमची कोणतीही इच्छा खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर रविवारी संध्याकाळी एका पिंपळाच्या पानावर तुमची इच्छा लिहा आणि ते पान वाहत्या पाण्यात सोडा. असे केल्याने तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.